गुरूवार, 25 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2017 (18:01 IST)

सेरेना विलियम्सच्या घरी नन्ह्या परीचं आगमन

Serena Williams gives birth to baby girl 2 September 2017  From the section US & Canada
अमेरिकेनं टेनिस स्टार सेरेना विलियम्सच्या घरी नन्ह्या परीचं आगमन झाल होतं. सेरेना विल्यम्सपाठोपाठ नोव्हाक जोकोवीचच्या घरी नन्ह्या परीचे आगमन झालं आहे. या दोघांच्या मुली भाविष्यात कधी ग्रँड स्लॅम टेनीस स्पर्धेची फायनल खेळल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका अशी चर्चा गमतीने आंतरराष्ट्रीय टेनिस वर्तुळात सुरु झाली आहे.
 
36 वर्षीय सेरेनाने शुक्रवारी मुलीला जन्म दिला. सेरेनाची मोठी बहीण व्हिनस विल्यम्स हिने युएस ओपनच्या तिसऱ्या फेरीचा सामना जिंकल्यावर सेरेनाला मुलगी झाल्याची माहिती दिली. मी अतिशय आनंदी आहे. मावशी झाल्याचा आनंद मला शब्दात सांगता येत नाही, असं व्हिनसने म्हंटलं आहे. तसंच युएस ओपन टेनिसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सेरेनाला शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलं आहे. सेरेना सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. सेरेना नेहमीचं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गरदोरपणाच्या दरम्यानचे फोटो अपडेट करायची. नुकतंच ती वॅनिटी फेअर मॅगझिनच्या कव्हर पेजवरही झळकली. सेरेनाचा बेबी बंम्प फ्लॉन्ट करणारा फोटो त्या मासिकाच्या कव्हर पेजवर होता.
 
जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनच्या दोन दिवस आधी सेरेनाला गरोदर असल्याचं समजलं होतं. त्यावेळी गरोदर असताना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना सहभागी झाली. सेरेनाने ग्रँड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. सेरेनाने सुरूवातीला ती गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली नव्हती पण अनावधानाने सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या फोटोंमुळे ती गर्भावस्थेत असल्याचं लोकांना समजलं