रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

माद्रिद ओपनसाठी शारापोव्हाला वाईल्ड कार्ड

रशियाची टेनिस स्टार मारिया शारापोव्हा हिला माद्रिद ओपन स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड दिले गेले असून ही स्पर्धा पाच मे पासून सुरू होणार आहे. मेलडोनिया या उत्तेजक औषधाचे सेवन केल्याच्या कारणावरून मारियावर 15 महिन्यांची बंदी घातली गेली होती. मारियावरचे निलंबन संपल्यानंतर तिची ही दुसरी टूर्नामेंट आहे. ती एप्रिलमध्ये स्टुटगार्ड ग्रांप्रीमध्येही खेळणार आहे. गेली 15 वर्षे मारिया सर्वश्रेष्ठ खेळाडूतील एक असल्याने व तिने अनेक विजय मिळविले असल्याने तिला माद्रिद स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड दिले गेल्याचे व येथे ती तिचा सर्वोत्तम खेळ खेळेल, असे आयोजकांनी सांगितले.
 
मारियाने औषध घेतल्याचे कबूल केले होते. मात्र, जाणूनबजून औषध घेतले नव्हते असेही स्पष्टीकरण तिने दिले.