आज मलप्पुरम येथे सुरू होणार संतोष ट्रॉफीला सुरुवात
केरळच्या मलप्पुरम येथे आजपासून संतोष ट्रॉफीची 75 वी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप सुरू होणार आहे. या चॅम्पियनशिपचे सर्व सामने मंजेरी पय्यानाडआणि कोट्टापाडी स्टेडियमवर पश्चिम बंगाल पंजाबशी भिडणार आहे. पश्चिम बंगालने यापूर्वी 32 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
पंजाब आणि बंगालमध्ये हा पहिला सामना कोट्टापडी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार आहे. फायनल सामना 2 मे रोजी मंजेरी पय्यानाड येथे होणार आहे. या 10 संघाला पाच-पाच च्या दोन गटात विभागले आहे. प्रत्येक ग्रुपची विजेते संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणार. शेवटचा सामना 28 आणि 29 एप्रिल रोजी खेळला जाणार. केरळ सरकार या स्पर्धेचे आयोजन करत आहे. ग्रुप ए मध्ये मेघालय, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि केरळ चा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये गुजरात, कर्नाटक, ओडिशा, सेना आणि मणिपूर आहे.