गुरूवार, 16 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

जेव्हा खलीने पाच रूपयासाठी केली होती मजदूरी

When the Great Khali Slogged it Out to Earn Rs 5
द ग्रेट खलीने असे ही दिवस बघितले आहे जेव्हा त्याचे आई- वडील अडीच रुपये फीस भरू शकले नाही म्हणून त्याला शाळेतून बाहेर काढले होते आणि आठ वर्षाच्या वयात रोज पाच रुपये कमाविण्यासाठी त्याला गावात माळी म्हणून नोकरी करावी लागली होती.
 
खलीने लहानपणी खूप वाईट दिवस बघितले आहेत. तो मजदूरी करायचा. आपल्या हाईटमुळे लोकं त्यावर थट्टा करायचे. नंतर त्याने कुश्तीत पदार्पण केले आणि असे काही करून दाखवले जे आधी कोणत्याही भारतीयने केले नव्हते. खली डब्ल्यूडब्ल्यूई यात पदार्पण करणारा पहिला भारतीय पैलवान बनला.
 
खली आणि विनीत बंसलद्वारे संयुक्त रूपात लिहिलेली पुस्तक द मॅन हू बिकम खली मध्ये खलीच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या. शाळेत त्याने खूप वाईट काळ बघितला. मित्र त्यावर हसायचे, आई-वडील फीस भरण्यात अक्षम होते. त्याने सांगितले की 1979 मध्ये मला शाळेतून काढून टाकले कारण पावसाच्या अभावात पीक वाळले होते आणि आमच्याकडे फीस भरायला पैसे नव्हते. त्या दिवशी माझ्या क्लास टीचरने पूर्ण वर्गासमोर मला अपमानित केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी माझी थट्टा केली. त्यानंतर मी ठरवले की आता शाळेत कधीच पाय ठेवायचा नाही.
 
खली म्हणाला, तेव्हा शाळेपासून माझे नाते तुटले आणि मी कुटुंबाची मदत करण्यासाठी वडिलांसोबत मजदूरी मजदूरी करायला लागलो. तेव्हा मजदूरी करण्याचे पाच रुपये मिळायचे आणि पाच रुपये माझ्यासाठी मोठी रक्कम होती कारण अडीच रूपयांसाठी शाळा सोडावी लागली तर ही किंमत तर त्याहून दुप्पट होती. 
 
त्याने सांगितले की तेव्हा मला पर्वताहून चार किमी खाली उतरून नर्सरीतून झाडं आणून लावावे लागायचे. नवीन झाडं आणायला पुन्हा- पुन्हा खाली जावं लागायचं. पहिल्यांदा मिळालेली मजदूरीचे क्षण मला आजही आठवतात. तो अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही, ते माझ्या सुखद आठवणींमधून एक आहे.