1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जुलै 2025 (19:51 IST)

विश्वविजेत्या गुकेशने सहाव्या फेरीत नंबर-1 मॅग्नस कार्लसनचा पराभव केला

World Chess Champion
जागतिक बुद्धिबळ विजेता भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ग्रँड चेस टूर रॅपिड 2025 च्या झाग्रेब लेगमध्ये सहाव्या फेरीत नॉर्वेच्या जागतिक नंबर वन मॅग्नस कार्लसनचा काळ्या मोहऱ्यांसह पराभव केला. त्याने 10 गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे.
पहिल्या दिवशी तीनपैकी दोन सामने जिंकणाऱ्या गुकेशने चौथ्या आणि पाचव्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह आणि अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना यांना पराभूत केले. गुकेशचा कार्लसनवर हा सलग दुसरा विजय आहे. गेल्या महिन्यात त्याने नॉर्वे बुद्धिबळात कार्लसनला हरवले.
पहिल्या सामन्यात गुकेशला पोलंडच्या दुडाने 59 चालींमध्ये पराभूत केले. यानंतर गुकेशने पुनरागमन केले. त्याने फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजा आणि देशबांधव प्रज्ञनांधाचा पराभव केला.
Edited By - Priya Dixit