मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

हुंड्याविरोधात योगेश्वरने थोपटले दंड

हुंड्याविरोधात योगेश्वरने थोपटले दंड
भारतातील ख्यातनाम कुस्तीपटू योगेश्वर दत्त कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्धी खेळाडूंना धोबीपछाड करत असला तरी आता त्याने हुंड्याविरोधात दंड थोपटले आहे. योगेश्वरने ‍दक्षिणा म्हणून हुंड्याच्या स्वरूपात फक्त एक रूपया स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
 
योगेश्वरने सांगितले की मी आमच्या कुटुंबातील मुलींच्या लग्नात हुंडा देताना होणारा त्रास बघितला आहे. मी दोन गोष्टींचा निर्धार केला होता. एक म्हणजे कुस्ती खेळण्याचा आणि दुसरा म्हणजे हुंडा न स्वीकारण्याचा. या दोन्ही गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत. योगेश्वरची आई सुशिला देवी यांनी मुलाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली.