गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

भालाफेकपटू नीरजने रचला ‘सोनेरी’ इतिहास

नवी दिल्ली- पोलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत भारताचा तरुण-तडफदार भालाफेकपटू नीरज चोप्राने देशाचा तिरंगा डौलाने फडकवला आहे. 18 वर्षीय नीरजने विश्वविक्रम रचत भारताला अँथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याची किमया केली आहे.
 
भालाफेकीच्या 20 वर्षाखालील गटात नीरजने 86.48 मीटर लांब भाला फेकून लॅटेवियाच्या जिगिमुंडस सिर्यमसचा 84.69 मीटरचा विक्रम मोडित काढला.
 
पहिल्या प्रयत्नात नीरजने 79.66 मीटर लांब भाला फेकला होता, परंतु दुसर्‍या प्रयत्नात त्याने 86.48 मीटरचा पल्ला गाठला आणि विश्वविक्रमाला गवसणी घालत सुवर्णपदकावर नाव कोरले. 80.59 मीटर अंतरावर भाला फेकणार्‍या दक्षिण आफ्रिकेच्या जोहान ग्रॉबलरने रौप्य, तर 79.65 मीटर अंतरावर भाला फेकणार्‍या ग्रानाडाच्या अँडरसन पीटर्सने कांस्यपदक पटकावले.