शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शनिवार, 4 जून 2016 (12:33 IST)

महान बॉक्सर मोहम्मद यांचे निधन

महान मुक्केबाज (मुष्टियुद्ध) मोहम्मद अली यांचे शनिवारी अमेरिकेतील एका दवाखान्यात निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. मोहम्मद अली यांच्या निधनाच्या बातमीमुळे जगभरातील बॉक्सिंग चाहत्यांनी दुख व्यक्त केला आहे. श्वसनास त्रास होऊ लागल्यामुळे मोहम्मद अली यांना शुक्रवारी अमेरिकेतील अॅरिझोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. अली यांच्या कुटुंबाचे प्रवक्ते बॉब गनेल यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मोहम्मद अली यांच्या निधनामुळे फक्त एक महान खेळाडू नव्हे तर जगातील मानवी हक्क चळवळीस प्रेरणा देणारा एक खंदा कार्यकर्ता हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.
 
'अली यांची प्रकृती खूप ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार देण्यात येत आहेत' असे निवेदन कालच गनेल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासांतच अली यांची प्रकृती ढासळली व त्यांची प्राणज्योत मालवली. 
 
बॉक्सिंगच्या दुनियेतील महान खेळाडू असलेले अली यांची 'हेविवेट चॅम्पियन' अशी ओळख होती. तीनेवळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मोहम्मद अलींनी ऑलिंपिकमध्ये मुष्टियुद्ध खेळात सुवर्णपदक जिंकले होते. 
 
मात्र बॉक्सिंगमधून निवृत्त झाल्यानंतर १९८४ साली ते पार्किन्सन आजारामुळे त्रस्त होते, त्या आजाराशी त्यांनी अनेक वर्ष लढा दिला. मात्र याच आजाराने आज त्यांना हरवले.  गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती व श्वसनास होऊ लागलेल्या त्रासामुळे त्यांनादोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.