1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (18:52 IST)

14 डिसेंबरपर्यंत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोफत सेवा

aadhar pan
आधार कार्डबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वी बनले असेल किंवा 10 वर्षांपूर्वी अपडेट केले असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करावे लागेल. सरकारने म्हटले आहे की ज्यांचे आधार 10 वर्षे जुने आहेत त्यांना त्यांचे आधार अनिवार्यपणे अपडेट करावे लागतील. त्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.  आधार कार्ड 14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करू शकता. तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत अपडेट न केल्यास, तुम्हाला नंतर अपडेटसाठी पैसे द्यावे लागतील. घरी बसल्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबवा. 
 
आवश्यक कागदपत्रे-
आधार अपडेटसाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. पहिले ओळखपत्र आणि दुसरा पत्ता पुरावा. आधार अपडेटसाठी आधार केंद्रावर सहसा ५० रुपये शुल्क आकारले जाते, परंतु UIDAI नुसार, ही सेवा 14 डिसेंबरपर्यंत मोफत आहे. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही मतदार कार्ड देऊ शकता.
 
प्रक्रिया- 
मोबाइल किंवा लॅपटॉपवरून UIDAI वेबसाइटवर जा. 
यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा. 
आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा.
यानंतर डॉक्युमेंट अपडेट वर क्लिक करा आणि व्हेरिफाय करा. 
आता खालील ड्रॉप लिस्टमधून ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्ता पुरावा अपलोड करा.
आता सबमिट वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला एक विनंती क्रमांक मिळेल आणि फॉर्म सबमिट केला जाईल.
विनंती क्रमांकावरून अपडेटची स्थिती देखील तपासण्यास सक्षम असाल. 
काही दिवसांनी तुमचा आधार अपडेट होईल.

Edited by - Priya Dixit