suvichar
✕

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची जनजागृती

Updated: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (12:28 IST)
 
या योजनेबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यासाठी दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी माहिती दिली. राज्य शासनाच्या निर्णयानुसार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये करोना आजाराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. जिल्ह्यत सहा शासकीय रुग्णालयांसह एकूण २७ रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत. नागरिकांनी आपल्याला या योजनेची मदत लागणार नाही यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
 
परंतु, करोनाची बाधा झाल्यास वेळीच रुग्णालयात पोहचून उपचार सुरू करावेत. त्यासोबतच किमान कागदपत्रे ज्यामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत ठेवून रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रक्रिया करण्यास सांगावे तसेच याबाबत दूरध्वनीवरून माहिती देण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करण्यास रुग्णालय प्रशासनास सांगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.  या योजनेसाठी यापूर्वीच उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी रुग्णांना मदत करत असल्याची ते वेळोवेळी खातरजमा करत आहेत. या योजनेसाठी पंकज दाभाडे यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. नागरिकांनी या योजनेबाबत काही अडचणी असल्यास दाभाडे यांच्याशी ९४०४५ ९४१६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

मुंबईतील विरार येथे एका फ्लॅटमध्ये तीन सख्ख्या भावंडांचे मृतदेह आढळले

रशियन ड्रोनचा युक्रेनियन ट्रेनवर हल्ला, १३ जणांचा मृत्यू

मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय! मलिंगासह दोन महत्त्वाच्या प्रशिक्षकांची सुट्टी; IPL 2027 पूर्वी सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल

LIVE: अकोल्यात दुष्काळाचा फटका: १ लाख रुपयांच्या कर्जापोटी दिव्यांग शेतकऱ्याचे घर सील

नागपुरातील पराभवामुळे महायुतीत वादाची ठिणगी; शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली!

पुढील लेख
Show comments