सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:47 IST)

Paytm यूजर्ससाठी खुशखबर: आता इंटरनेटशिवाय पेमेंट करा, जाणून घ्या कसे?

पेमेंट सेवा अधिक सुलभ करण्यासाठी पेटीएमने खास फीचर लाँच केले आहे. डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गुरुवारी 'टॅप टू पे' (Tap to Pay) लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हे वैशिष्ट्य वापरकर्त्याला POS मशीनवर त्याचा/तिचा फोन टॅप करून त्वरित पेमेंट करण्यास सक्षम करते, म्हणजे पेटीएम वापरकर्त्यांना टॅप टू पेद्वारे पेमेंट करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे किंवा OTP प्रविष्ट करणे आवश्यक नाही आहे. त्याऐवजी, ते PoS मशीनला स्पर्श करून पैसे देऊ शकतात.  
 
पेमेंटसाठी इंटरनेटची गरज नाही 
पेटीएमच्या या फीचरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंटच्या वेळी यूजर्सना त्यांच्या फोनचे लॉकही उघडावे लागणार नाही. म्हणजेच फोन लॉक असला तरी पेमेंट होईल. एवढेच नाही तर वापरकर्ते इंटरनेट कनेक्शन किंवा मोबाइल डेटाशिवाय पीओएस मशीनला टच करून पेमेंट करू शकतात. पेटीएमची 'टॅप टू पे' सेवा Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे, जे पेटीएम ऑल-इन-वन POS डिव्हाइसेस आणि इतर बँकांच्या POS मशीनमधून पैसे देतात. 
Paytm Appवर 'टैप टू पे'चा वापर करण्यासाठी यूजर्सला करावे लागतील हे स्टेप फॉलो-
1. प्रथम 'टॅप टू पे' होम स्क्रीनवर "नवीन कार्ड जोडा" “Add New Card”वर क्लिक करा किंवा कार्ड सूचीमधून सेव्ह केलेले कार्ड निवडा.
 
2. आता कार्डशी संबंधित आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
 
3. यानंतर तुम्हाला टॅप टू पेशी संबंधित अटी आणि नियम 'स्वीकार' करावे लागतील.
 
4. कार्डसोबत नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर OTP पाठवला जाईल. 
 
5. OTP भरल्यानंतर, तुम्ही टॅप टू पे होम स्क्रीनच्या शीर्षस्थानी सक्रिय केलेले कार्ड पाहू शकता.
 
थर्ड पार्टीसोबत शेअर होत नाही डिटेल    
तपशील या सेवेअंतर्गत, तुम्हाला पेटीएम ऑल इन वन पीओएस डिव्हाइसेस आणि इतर बँकांच्या पीओएस मशीनमधून पेमेंट करण्यासाठी तुमचे व्हर्च्युअल कार्ड सक्रिय करावे लागेल. सेवेमध्ये, तुमचा 16 अंकी कार्ड क्रमांक डिजिटल कार्डमध्ये रूपांतरित केला जातो जो किरकोळ दुकानांमध्ये जलद पेमेंट व्यवहार सुलभ करू शकतो. याद्वारे कार्ड पेमेंट सुरक्षित आहे. यामध्ये युजरचे कार्ड डिटेल्स युजरकडे असतात आणि ते कोणत्याही थर्ड पार्टी पेमेंट प्रोसेसरसोबत शेअर केले जात नाहीत. या अंतर्गत, रिटेल आउटलेटवर पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्याला त्याच्या कार्डचे तपशील कोणाशीही शेअर करण्याची आवश्यकता नाही आणि POS डिव्हाइसेसद्वारे सहजपणे पेमेंट करू शकतो.