शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (16:01 IST)

आपण इंटरनेटशिवाय UPI पेमेंट देखील करू शकता, या 6 चरणांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया समजून घ्या

UPI पेमेंटसाठी इंटरनेट नेहमीच आवश्यक नसते. मोबाईल डेटा पॅक संपल्यानंतरही तुम्ही UPI सह पेमेंट करू शकता. कधीकधी असे देखील घडते की आपण जिथे राहता त्या ठिकाणचा इंटरनेट स्पीड खूपच स्लो असतो किंवा नेटवर्क खूप खराब असते. अशा परिस्थितीत, UPI पेमेंट करण्यात समस्या असू शकते, परंतु असे होऊ शकत नाही की आपण कोणालाही पेमेंट करू शकणार नाही. जर आपल्याला कधी अशी समस्या उद्भवली असेल तर जाणून घ्या की ऑफलाइन UPI ​​पेमेंट देखील करता येते, ते सुद्धा आपल्या  मोबाईल फोनवरून सहज.
 
यूपीआय पेमेंटसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत जे ग्राहकांना पाळावे लागतात. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्रमांकावरून UPI ​​पेमेंट करायचे आहे, तो नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. जर मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला नसेल आणि आपल्याला ज्या नंबरवरून UPI ​​पेमेंट करायचे असेल तर ते यशस्वी होणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या की इंटरनेट शिवाय किंवा ऑफलाईन UPI पेमेंट कसे करू शकता.
 
ऑफलाइनशिवाय UPI पेमेंट कसे करू शकता.-
 
 1- सर्वप्रथम फोनच्या डायलरवर जा, येथे *99# टाइप करा. नंतर कॉल बटण दाबा
 2- आपल्या स्क्रीनवर एक पॉप अप मेनू दिसेल ज्यामध्ये अनेक पर्याय दिसतील. आपल्या गरजेनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडा. त्याच्याशी संबंधित क्रमांक टाका आणि send वर क्लिक करा
 3- आता ज्या पर्यायातून आपल्याला UPI द्वारे पैसे पाठवायचे आहेत ते निवडा. जर आपल्याला  मोबाईल नंबरद्वारे रिसीव्हरला पैसे पाठवायचे असतील तर तो पर्याय निवडा आणि मोबाईल नंबर टाका
 4- आपण प्राप्तकर्त्याला पाठवू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि send बटण दाबा
 5- प्राप्तकर्त्याला कॉलममध्ये रिमार्क लिहायला सांगितले जाते. त्यात आपले रिमार्क टाका.
 6- ट्राजेक्शन पूर्ण करण्यासाठी आता UPI पिन टाका. आपले ट्राजेक्शन यशस्वी होईल आणि कोणत्याही इंटरनेटची आवश्यकता देखील पडणार नाही.
 
अशा प्रकारे बेलेंस तपासा
आपल्या खात्यातून पैसे हस्तांतरित झाल्याचे किंवा पैसे कमी झाल्याचा त्वरित संदेश येतो ,जर ते आले नाही, तर आपण खात्याचा मेसेज तपासू शकता आणि जाणून घेऊ शकता की किती पैसे कापले गेले आहेत आणि किती बेलेंस आहे.जर आपण  Google Pay द्वारे UPI पेमेंट केले तर यासाठी तुम्हाला Google Pay उघडावे लागेल. वरच्या उजवीकडे तुमच्या बँक खात्यावर टॅप करा. ज्या खात्याचे  बेलेंस आपण तपासू इच्छित आहात त्यावर टॅप करा. येथे  balance chcek वर क्लिक करा आणि आपला UPI पिन प्रविष्ट करा. हेआपल्या खात्यातील बेलेंस दर्शवेल. ते दिसत नसल्यास, आपण योग्य पिन प्रविष्ट केला असल्याचे सुनिश्चित करा. जर आपण  पिन नंबर विसरलात तर आपण नवीन पिन तयार करू शकता. यासाठी तुम्हाला बँक खाते हटवावे लागेल आणि ते पुन्हा जोडावे लागेल.
 
UPI काय आहे
यूपीआय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणतो, ही डिजिटल पेमेंट पद्धत आहे जी मोबाईल अॅपद्वारे कार्य करते. तुम्ही या अॅपद्वारे सुरक्षित मार्गाने पेमेंट करू शकता. पैसे अडकले तरी ते बँक खात्यात परत मिळतात. तुम्ही बिल भरू शकता, निधी ऑनलाइन हस्तांतरित करू शकता आणि UPI द्वारे नातेवाईकांना किंवा मित्रांना पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करावे लागेल आणि मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा.