गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

व्हॅलेंटाईनच्या दिवशी काय करतात रोमचे तरुण

14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे च्या रूपात साजरा केला जातो. जग भरात प्रसिद्ध झालेला हा दिवस तरुण प्रेमी जोडप्यांसाठी तर एखाद्या सणापेक्षा कमी नाही. या दिवशी तरुण एकमेकांना लाल रंगाच्या गुलाबाचे फूल आणि गिफ्ट देऊन आपले प्रेम अभिव्यक्त करतात.
रोमन कॅथोलिक संत व्हलेंटाईन यांच्या नावाने प्रचलित हा दिवस पुरातनवादी रोमन ल्यूपर केलिआ नावानेदेखील उत्साहपूर्वक साजरा केला जातो. या दिवशी पूज्य देवता पेन यांच्याप्रती श्रद्धा स्वरूप हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी तरुण लोकं एक खेळ खेळतात. युवक आपल्या मनपसंत युवतीचे नाव एक कागदावर लिहून एका डब्यात टाकतात. नंतर डोळे बंद करून चिठ्ठी उचलतात, त्यावर असलेल्या नावाच्या मुलीसोबत हा दिवस साजरा करतात.
 
ते बरोबर डांस करतात, गाणी म्हणतात, हसत-खेळत बरोबर खातात-पितात. इंग्रजी साहित्यात हा प्रेम दिवसाला मिलन ऋतूचे सण मानले आहे.