सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (16:15 IST)

Kiss Day : एक नवी कळी गालावर हळुवार उमलते!

चुंबन लहानपणी पासून आपल्या गालावर विराजमान झालेलं,
आई आजी नी भरभरून आपल्या ला केलेलं,
काही चांगलं कौतुकाच केलं, की आई हेंच घेणार,
कोडकौतुक करून काहीसं चांगलं खायला देणार,
प्रियकराच्या चुंबना न तर बदलुन जाते दुनिया सारी,
पंखावीण उडून येते, ही मनातली परी,
अलगद होतो पिसापरी जीव आपला,
जणू तो नसतोच मुळी या दुनियेतला,
समर्पणाची भावना ,त्यातूनच जन्मते,
एक नवी कळी गालावर हळुवार उमलते!
...अश्विनी थत्ते