1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
  4. आघाडीतही बिघाडी, अजित पवार आज बोलणार

आघाडीतही बिघाडी, अजित पवार आज बोलणार

Maharashtra Assembly Elections 2014
गेली तीन टर्म एकत्र सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळे, यासंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी दुपारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला काही उत्तर न दिल्यामुळे अजित पवार हे काँग्रेसला अल्टीमेटम देतात की, नाही याबद्दल राजकीय वतरुळात चर्चा सुरू झाली आहे.

राजकारण हे नेहमी प्रवाही असते. राजकारणातील घडामोडी सतत बदलत असतात. लोकसभेनंतर राज्यात काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे यंदा निम्या म्हणजे 144 जागांचा आग्रह राष्ट्रवादीने काँग्रेसकडे धरला आहे. जागावाटपाच्या प्रश्नावर काँग्रेसचे दिल्ली हायकमांड लक्ष घालायला तयार नसून, राज्यातील काँग्रेस नेते एकही जागा वाढवून द्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी अजित पवार काय बोलता याबद्दल जनतेत औत्सुक्य आहे.