स्वातंत्र्यवी भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते.यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भंगुर गावी झाला. सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यांतील चळवळीचे क्रांतिकारक, भारतीय राजकारणातील महत्त्वाचे राजकारणी, हिंदू संघटक, जातिभेदाचा विरोध करणारे सामाजिक क्रांतिकारक, प्रतिभावंत, साहित्यिक प्रचारक भाषा आणि लिपी शुद्धीचे प्रणेते होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक आणि पत्रकार प्रह्लाद केशव अत्रे यांनी दिली आहे.
त्यांनी वयाच्या13 वर्षी स्वदेशी फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र रचना केली .चापेकर बंधूंना फाशी दिल्याचे कळताच लहानग्या सावरकरांनी आपल्या कुलदेवी सामोरं "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता-मारता मरे पर्यंत झुंजेन" अशी शपथ घेतली.
मार्च, इ.स.1901 मध्ये त्यांचा विवाह यमुनाबाईंशी झाला. इ.स. 1902साली लग्नानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. 1906 साली उच्च शिक्षणासाठी परदेशात (लंडन)ला गेले.
सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स.1905 साली विदेशी कापडांची होळी केली. श्यामजीकृष्ण वर्मानं ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती ह्यांना मिळाली व त्या नंतर ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. त्यांनाच शिष्यवृत्ती मिळावी असे लोकमान्य टिळकाने सुचवले होते. लंडन मध्ये इंडिया-हाउस मध्ये वास्तव्यास असताना यांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. याची प्रस्तावना करताना ह्यांनी सशस्त्र क्रांतींचे तत्त्वज्ञानं विशद केले होते. लंडनच्या इंडिया-हाउस मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रां हे यांचे पहिले हुतात्मा शिष्य होते. मदनलाल ने कर्झन वायली नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करून हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली. त्याच काळात सावरकरांनी इतर देशातील क्रांतिकारी गटांशी संपर्क साधून त्यांच्यांकडून बॉम्बं तयार करायचे तंत्रज्ञान घेतले. ते तंत्रज्ञान आणि 22 पिस्तुले यांनी भारतात पाठवली. त्यांपैकीच एका पिस्तुलांनी अनंत कान्हेरे या 16 वर्षीय वीराने नाशिकच्या कलेक्टर जेक्सनचे वध केले. तत्पश्चात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांना तिघांना फाशी देण्यात आली.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापित केली. इ.स.1857 मध्ये इंग्रेजाविरुद्ध भारतात झालेल्या उठावावर सावरकरांनी "अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर" हा ग्रंथ लिहिला होता. त्यांच्या थोरल्या बंधूंना राजद्रोहावर लिखाणासाठीच्या आरोपावरून काळ्यापाण्याची शिक्षा केली गेली. या गोष्टीवर संतापून मदनलालधिंग्राने कर्झनला मारले. यांच्यात ज्या पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता ते सावरकरांनी पाठविले हे कळल्यावर ब्रिटिश सरकाराने सावरकरांना अटक केली. त्यांना समुद्राच्या वाटेने भारतात आणताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारून पोहत-पोहत फ्रान्सचा समुद्री किनारा गाठला. तिथून त्यांना अटक करून परत भारतात आणुन त्यांचा वर खटला चालवून त्यांना जन्मठेपेची काळ्यापाण्याची शिक्षा अंदमानच्या तुरुंगात करण्यात आली. अंदमानला त्यांच्यावर अमानुष अत्याचार झालेत पण तरीही तेथे लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भिंतीवर कोळशानी त्यांनी महाकाव्य लिहिले.
अंदमानातून सुटल्यावर त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध के. त्यांनी हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी रत्नागिरीत कार्य केले. त्यांनी 500 मंदिरे अस्पृश्यांसाठी उघडली, अनेक आंतरजातीय विवाह लावले आणि सर्वांसाठी "पतीत-पावन-मंदिर" सुरु केले. ह्यात सर्व जातीच्या लोकांना प्रवेश सुरू केले. अनेक भोजनालय सर्वधर्मांसाठी सुरू केले.
त्यांच्यातला विशेष गुण म्हणजे की ते फक्त विचार करून थांबत नव्हते तर कृतीतून करून दाखवायचे. त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात लिहिले होते की "माझे प्रेत शक्यतो विद्युत चितेवरच जाळण्यात यावे, जुन्या पद्धतीने माणसांनी खांद्यावर नेऊ नये किंवा कोणत्याही प्राणाच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत स्मशानात न्यावे. माझ्या मृत्यू निमित्त कोणीही आपले दुकान किंवा व्यवसाय बंद ठेवू नये. अशाने समाजाला फार त्रास होतो. माझ्या निधनाचे कोणतेही सुतक, विटाळा ज्याने कुटुंबीयांना त्रास होतो. अश्या रूढी पाळू नये. पिंडदान, काकस्पर्श सारख्या काळबाह्य गोष्टी पाळू नये. यांचे निधन 26 फेब्रुवारी 1966 रोजी महाराष्ट्राच्या मुंबई शहरात दादर या ठिकाणी झाले.
उत्कट देशभक्त, जहाल क्रांतिकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असे सर्वगुण एकाच माणसात या पृथ्वीतलावर असु शकतात हे कुणालाही खरे वाटणार नाही. स्वा. विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता.
स्वातंत्त्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पाश्र्वभूमीवर आधारित कादंबर्यांचा लेखक ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. जयोस्तुतेहे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या 20 व्या वर्षी लिहिले. सावरकरांनी त्यांचा कविता महाविद्यालात, लंडनच्या वास्तवत, अंदमानच काळकोठडीत आणि रत्नगिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतीवर महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, मार्दव व माधरु ही त्यांच्या काव्याची वैशिष्टय़े. 22 व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता.
आयुष्याचा क्षणन् क्षण आणि शरीराचा कणन् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने अन्नत्याग करून 26 फेब्रुवारी 1966 मध्ये देहत्याग केला.
सावरकर.... एकमेवाद्वितीय.....
१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन 1900मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..
२) 1857 च्या बंडास "सातंत्र्ययुद्ध" म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.
३) 1857 च्या समरानंतर हिंदुस्तानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकास, "मॅग्ना कार्टा" ला "एक भिकार चिरोटे" म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, 1900 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी..
४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी.ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी...
५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन 1905 मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी 1921 साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.
६) परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी.....
७) मे,1909 मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी...
८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच...
९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...
१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक...
११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील 1857 च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...
१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच....
१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले...
१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतीकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले... त्यासाठी तुर्की,रशियन,आयरिश,इजिप्शियन,फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता...
१५) विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फ़क्त सावरकरच...
१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर.... तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या,मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर...
१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वीतीय...
१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव... व्याकरणात त्या व्रूत्तांना "वैनायक" म्हणून ओळखले जाते.
१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.
२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले...
२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदीर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै. श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत "पतितपावन" मंदीर बांधले.
२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..
२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असतना, मात्रूभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फ़क्त सावरकरच पहिले...
२४) प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, "लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या" असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच...
२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच.... लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फ़क्त सावरकरच.....
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सुविचार
हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण
जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.
पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे.
आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके तरी शाब्दिक, बौद्धिक, राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे.
अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्माला.
कष्ट च तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.
मनुष्याच्या सर्व शक्ती ह्या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे.
उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही.
आपल्या प्रामाणिक पणाचा वापर होईल पण केव्हा तर दुसर्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिक पणा बलवान असेल तेव्हाच.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर त्यांनी लिहलेली कवीता:
हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभविं सारीं । मंगले
या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.