गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. सावरकर
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (14:59 IST)

वीर सावरकर जयंती निमित्त : सावरकर.... एकमेवाद्वितीय.....

१) हिंदुस्तानला संपूर्ण स्वातंत्र्य हवे अशी मागणी करणारे हे पहिलेच पुढारी. सन १९०० मध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती..
२) १८५७ च्या बंडास "सातंत्र्ययुद्ध" म्हणून गौरवणारे पहिलेच इतिहास संशोधक.
३) १८५७ च्या समरानंतर हिंदुस्तानातील जनतेला शमवण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने काढलेल्या पत्रकास, "मॅग्ना कार्टा" ला "एक भिकार चिरोटे" म्हणून झिडकारणारे सावरकर पहिलेच, १९०० साली म्हणजे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..
४) देशभक्ती केली म्हणून ज्यांची बी.ए. ची पदवी काढून घेतली असे पहिले विद्यार्थी...
५) परदेशी मालाची होळी करणारे सावरकर हे पहिलेच पुढारी, सन १९०५ मध्येच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा संदेश दिला, मात्र कॉंग्रेसच्या गांधींनी १९२१ साली सावरकरांचे हेच तत्व तंतोतंत उचलले आणि लोकप्रिय झाले.
६) परदेशी मालाच्या होळीमुळे देशभक्तीच्या कारणास्तव वसतीगृहातून काढून टाकलेले सावरकर हे पहिलेच विद्यार्थी.....
७) मे,१९०९ मध्ये बॅरिस्टर होऊनही सनद दिली नाही असे सावरकर हे पहिलेच विद्यार्थी...
८) शत्रूच्या राजधानीत जाऊन (लंडन) त्यांच्या विरोधात युद्ध पुकारण्याची हिंमत ठेवणारे सावरकर हे पहिलेच...
९) शत्रूच्या ताब्यातून (मार्सेलिस बंदर) धाडसाने सागरात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...
१०) प्रसिद्धीपूर्वीच ज्यांचे ग्रंथ जप्त करण्यात आले असे पहिलेच क्रांतीकारक...
११) शत्रूच्या राजधानीत जाऊन लंडनमधील १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा सुवर्णमहोत्सव साजरा करणारे सावरकर हे पहिलेच क्रांतीकारी...
१२) शिखांचा इतिहास लिहिणारे पहिले लेखक हे सावरकरच....
१३) स्वातंत्र्यलढ्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्याचा पराक्रम करणारे सावरकर हेच पहिले...
१४) भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सर्व देशातील क्रांतीकारकांची संघटना उभारणारे सावरकर हेच पहिले... त्यासाठी तुर्की,रशियन,आयरिश,इजिप्शियन,फ़्रेंच इ. क्रांतीकारकांशी संपर्क केला होता...
१५) विसाव्या शतकात २ जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आलेले सावरकर हे एकमेव आणि फ़क्त सावरकरच...
१६) अंदमानच्या कारावासात भिंतींवर काट्याने आणि खिळ्याने महाकव्य रचणारे महाकवी एकमेव सावरकर.... तसेच सुमारे ६००० पंक्ती कोठडीत लिहिल्या,मुखोद्गत करून बाहेर आल्यावर प्रकाशित करण्याचा महापराक्रम करणारे एकमेव असे सावरकर...
१७) बालपणी वहीनी व बहिणीसोबत ओव्यांच्या भेंड्या खेळताना त्यात नवनवीन ओव्या रचून त्यात स्वातंत्र्याची प्रेरणा गुंफू पहाणारे सावरकर हेच एकमेवाद्वीतीय...
१८) तुरुंगात असताना मराठी व्याकरणातील वृत्ते आठवत नाहीत म्हणून नवी वृत्ते रचून मराठी भाषेच्या व्याकरणात भर घालणारे सावरकर हेच एकमेव... व्याकरणात त्या व्रूत्तांना "वैनायक" म्हणून ओळखले जाते.
१९) अस्पृष्यांना रत्नागिरीत विट्ठल मंदीरात प्रवेश मिळवून देणारे सावरकर हेच पहिले.
२०) एका अस्पृश्याने शंकराचार्यांच्या गळ्यात हार घालण्याची घटना घडविणारे सावरकर हेच पहिले...
२१) अस्पृश्य लोक स्पर्श करू शकतील असे मंदीर स्वखर्चाने बांधवून घेणारे पहिले सावरकरच.. कै. श्री. भागोजी कीर यांनी सावरकरांच्याच प्रेरणेतून रत्नागिरीत "पतितपावन" मंदीर बांधले.
२२) भाषाशुद्धीचे महत्व सांगणारे सावरकरच..
२३) सगळे सुशिक्षित लोक इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हणून गौरवीत असतना, मात्रूभाषा व राष्ट्रभाषेचा अभिमान देशात जागवणारे फ़क्त सावरकरच पहिले...
२४) प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून, "लेखण्या सोडा, बंदुका हाती घ्या" असा दिव्य दाहक संदेश देणारे पहिले साहित्यिक सावरकरच...
२५) शास्त्रशुद्ध अभ्यास करून देवनागरी लिपी टंकलेखनास (टायपिंगसाठी) सुयोग्य बनवणारे सावरकरच.... लिपीमध्ये सुधारणा करणारा जगातील एकमेव नेता आणि लोकोत्तर पुरूष म्हणजे फ़क्त सावरकरच.....