शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. सावरकर
Written By वेबदुनिया|

सावरकरांची हिंदूत्वाची व्याख्या

हिंदू तो, की जो सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या या आ‍सिंधुसिंधुपर्यंतची भूमीला आपली पितृ मानतो त्याचप्रमाणें वैदिक सप्तसिंधूच्या प्रदेशांत ज्या जातीच्या प्रारंभाचा पहिला आणि दृश्य असा पुरावा मिळतो व ज्या जातीने नवीन प्रदेश आक्रमीत पुढे जात असतां ज्याचा स्वीकार केला ते ते सर्व आपल्यांत समाविष्ट केले आणि जे जे समाविष्ट केले ते परमोत्कर्षाला पोचविले व जी जाती पुढे हिंदू जाती या नावाने प्रसिद्ध पावली, त्या जातीचे रक्त हिंदू या नांवास पात्र होणार्‍या मनुष्याच्या अंगांत खेळत असते.

समान इतिहास, समान वाङ्मय, समान कला, एकच निर्बंध-विधान, एकच धर्मव्यवहारशास्त्र, सामायिक यात्रा महोत्सव, समाईक धार्मिक आचार विधी, समाईक सण आणि समाईक संस्कार, एवं गुणविशिष्ट अशी जी त्या महान् हिंदू जातीची संस्कृती त्या संस्कृतीचा वार साज्याला परंपरेने मिळालेला असतो, आणि या सर्वांपेक्षा ज्यामध्ये त्याचे तत्तवद्रष्ट ऋषी मुनी, संतमहंत, गुरु आणि अवतारी पुरुष जन्माला आले आणि ज्यामध्ये त्याची पुण्यकारक अशी यात्रास्थळें आहेत असे असिंधु सिंधू भारत ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे तो हिंदू ! हीच ती हिंदुत्वा ची आवश्यक लक्षणे: समान राष्ट्र, समान जाती नि समान संस्कृती. ही सर्व लक्षणे थोडक्यांत अशी सांगतां येतील की, हिंदू तो की जो या भूमीला नुसती पितृभूच नव्हे तर पुण्यभूहि मानतो. कारण हिंदुत्वाची पहिली जी दोन प्रमुख लक्षणे, राष्ट्र आणि जाती ही स्पष्टप णें पितृभू या शब्दाने दाखविली जातात. तर हिंदुत्वाचे तिसरे लक्षण जी संस्कृती ती प्रामुख्याने पुण्यभू या शब्दांत प्रतीत होते. कारण संस्कृतीमध्येच धार्मिक आचार-विधी नि संस्कार यांचा अंतर्भाव होतो आणि त्यामुळेच ही भूमी आपणाला पुण्यूभू होऊन राहते. हीच हिंदुत्वाची व्याख्या अधिक सुटसुटीत करण्याकरिता, ती पुढील अनुष्टुपांत ग्रथित करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर तो वायगा ठरणार नाही अशी आम्हाला आशा आहे.

आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्वैव व वै हिंदुरितिस्मृत: ।।

सिंधू (ब्रह्मपुत्रेलाही तिच्या उपनद्यांसह सिंधू म्हणतात) पासून सिंधू (समुद्र) पर्यंत पसरलेली ही भारतभूमी ज्याची पितृभू (पूर्वजांची भूमी) आणि पुण्यभूमी (धर्मासह संस्कृतीची भूमी) आहे तो हिंदू !!