वेढा वेढा रे पंढरी Download वेढा वेढा रे पंढरी | मोर्चेवला भीमातीरी || १ || चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ || लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ || तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||