1. लाईफस्टाईल
  2. शुभेच्छा व अभिवादन
  3. शुभेच्छा संदेश
  4. Diwali Padwa 2026 Wishes for Husband in Marathi

Diwali Padwa Wishes for Husband in Marathi 2026 दिवाळी पाडवा शुभेच्छा नवर्‍याला

माझ्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करून, 
सुख-समृद्धीचा प्रकाश आणणाऱ्या माझ्या प्रिय पतीला 
दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा! 
तुमची साथ, माझा आधार.
 
पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, 
लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे, 
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, 
तुझा सहवास जन्मभर राहू दे
दिवाळी पाडवा शुभेच्छा!
 
आपले नाते जसे दीप आणि वातीचे, 
तसेच अखंड आणि तेजस्वी राहो! 
हॅप्पी दिवाळी पाडवा, लव्ह यू
 
माझ्या राजाला दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 
तुझ्या असण्यानेच माझे आयुष्य पूर्ण आहे.
 
तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा, 
दिवाळी पाडवा शुभेच्छा!
 
पाडव्याचा हा शुभ प्रसंग, घेऊन येवो आनंदाचे रंग
नात्यात गोडवा, मनात समाधान
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे 
उत्तम दिनाचे महात्म्य आहे
सुखद ठरो हा छान पाडवा, 
त्यात असूदे अवीट गोडवा
 
अग्निफेऱ्यांच्या साक्षीने जोडलेले आपले नाते 
आज अधिकच घट्ट झाले आहे
तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी मी 
आणि माझे आयुष्य समृद्ध करणारे तुम्ही... 
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस 
तुमच्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखा उजळून निघतो
तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य 
आणि भरभरून यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा!
 
सुख-दुःखात नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या माझ्या प्रिय पतीदेव, 
तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या अनेक शुभेच्छा
आपले प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास 
असाच जन्मोजन्मी टिकून राहो.
 
उटण्याचा सुगंध आणि पणत्यांचा प्रकाश जसा मनाला ताजेतवाने करतो, 
तसेच तुमचे प्रेम माझ्या आयुष्याला नेहमी सुगंधित करते
माझ्या आयुष्यातील आधारस्तंभाला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दिवाळीचा हा पवित्र पाडवा आपल्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि अमर्याद प्रेम घेऊन येवो
तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे
दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
 
माझ्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या आणि प्रत्येक वळणावर 
माझी साथ देणाऱ्या माझ्या आयुष्याच्या साथीदाराला 
दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 
तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत
 
तुमचे हसणे माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी भेट आहे
आजच्या या मंगल प्रसंगी तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय पतीराज!
 
हा पाडवा तुमच्या आयुष्यात यशाच्या नव्या शिखरांचे आगमन करो
तुम्ही नेहमी असेच हसत राहा आणि मला आयुष्यभर सांभाळून घ्या!
पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
 
जशी दिव्याची वात आणि ज्योत एकत्र राहतात, 
तसेच आपले नाते सदैव घट्ट राहो
तुमच्यासोबत जगलेले प्रत्येक वर्ष
माझ्यासाठी अनमोल आहे
दिवाळी पाडव्याच्या प्रेमळ शुभेच्छा!
 
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तुम्ही आहात 
आणि माझ्या चेहऱ्यावरील हास्याचे रहस्य तुम्ही आहात
पाडव्याच्या या शुभ दिवशी तुम्हाला 
सुख, शांती आणि समृद्धी लाभो
शुभ पाडवा!
पुढील लेख
अजिबात मऊ पडणार नाही! १-२ महिने टिकणारी गव्हाच्या पिठाची खमंग चकली