1. लाईफस्टाईल
  2. शुभेच्छा व अभिवादन
  3. शुभेच्छा संदेश
  4. Shree Balasaheb Thackeray Smrutidin 2026 Vinmra Abhivadan

Shree Balasaheb Thackeray Smrutidin 2026 Vinmra Abhivadan हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन संदेश

"मराठी माणसाच्या हक्कांसाठी, अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!"
 
"ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर नवा इतिहास घडवला, अशा ओजस्वी वक्ता आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी नमन!"
 
"विचार कधी ममत नाहीत, नेतृत्व कधी विसरले जात नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!"
 
"मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे आणि हिंदुत्वाचा प्रखर आवाज बनलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली!"
 
"प्रखर हिंदुत्ववादी, व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद आवाज, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!"
 
"आपल्या ओजस्वी वाणीने आणि रोखठोक विचारांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे महानायक, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम"
 
"ताठ कण्याने जगायला शिका" हा मूलमंत्र देणारे, कोट्यवधी शिवसैनिकांचे दैवत आणि महाराष्ट्राचे लाडके नेते बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली.
 
"ज्यांच्या एका गर्जनेने संपूर्ण महाराष्ट्र हलत असे, अशा झुंजार आणि करारी नेतृत्वास, अर्थात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र वंदन"
 
"मराठी माणसाच्या हक्कांसाठी सदैव लढणारे आणि आपल्या कुंचल्याने व वाणीने इतिहास घडवणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!"
पुढील लेख
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रभावी व्यक्तिमत्त्व निबंध