Festival Posters
✕

IND vs PAK: आज होणार भारत -पाकिस्तानचा हाय वोल्टेज सामना, प्लेइंग 11 जाणून घ्या

Updated: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (17:12 IST)
 
टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकले. पाकिस्तानशिवाय भारताने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. त्याचवेळी भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर हाँगकाँगविरुद्धच्या गट सामन्यात पाकिस्तानने जबरदस्त पुनरागमन केले. त्यांनी हाँगकाँगचा 155 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून सुपर-4 साठी पात्र ठरले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. त्याचवेळी नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
 
ग्रुप स्टेज मॅचमध्ये भारताने प्रत्येक विभागात आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पाच विकेट्स राखून विजय मिळवला. 
 
भारताचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे असतील. हाँगकाँगविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता तो प्लेइंग-11 मध्ये परतणार आहे. रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.अशा परिस्थितीत त्याच्या जागी अक्षर पटेलला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
 
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
 
भारताला पहिली शक्यता -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत/दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/रवी बिश्नोई.
 
भारताची दुसरी शक्यता
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/रवी बिश्नोई .
 
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, हसन अली/मोहम्मद हसनैन.
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

भारताचा न्यूझीलंडवर थरारक विजय! डकवर्थ-लुईस पद्धतीने ४ धावांनी मारली बाजी

जी कमलिनीने टी-२० सामन्यात सहा षटकार ठोकत संघाला मोठा विजय मिळवून दिला

विराट कोहलीने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला

IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करणार; वेळ लक्षात घ्या

दिल्लीने आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नितीश राणाला तर मयंक आणि श्रेयस यांनाही वगळण्यात आले

पुढील लेख
Show comments