सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (00:25 IST)

दैनिक अंक ज्योतिष भविष्य 16.09.2022 Ank Jyotish 16 September 2022

numerology
अंक 1 - आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, त्यामुळे दिवस तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी असेल. पैसा येण्याची दाट शक्यता आहे. तुमचे छंद पूर्ण होतील, विद्यार्थ्यांचे निकाल अनुकूल असतील. कामासाठी बाहेर जाऊ शकता. मानसिकदृष्ट्या तुम्ही भीती आणि तणावापासून मुक्त व्हाल.
अंक 2 - आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन नवीन कामाला सुरुवात करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. मनोरंजनात देखील वेळ जाईल. कामात यश मिळेल.
अंक 3 - आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील. पण तुम्ही काही षड्यंत्राचे शिकार होऊ शकता, त्यामुळे सावध राहा. शत्रूंपासून सावध राहावे लागेल. परदेशात जाण्याची शक्यता आहे.
अंक 4 - आज तुमचा खर्च वाढू शकतो. कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील. अशा परिस्थितीत आजच आपल्या भविष्यातील निर्णय हुशारीने घ्या. आज पैसे जास्त खर्च होतील. नातेवाईकांकडून चुकीचा सल्ला मिळू शकतो. काळजी घ्या. प्रत्येक विषयाचे स्वतः मूल्यांकन करा.
अंक 5 - दुसऱ्याच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे टाळा. आज घरात तणावाचे वातावरण असू शकते, काही खबरदारी घ्या. कोणतेही सरकारी काम रखडले असेल तर त्याला आज गती येईल. जुन्या मित्राची भेट होईल.
अंक 6 - तुम्ही अधिक बोलका आहात, त्यामुळे बोलताना थोडा विचार करा. तुमच्या कामात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्रगतीचा मार्ग खुला होईल. रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
अंक 7 - आज तुमच्या घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. आज वाहने इत्यादींचा वापर टाळा, अपघात होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणांसाठी दिवस चांगला आहे. सहकार्याने व्यवसायात प्रगती होईल.
अंक 8 - आज नशीब तुमची साथ देणार आहे. आज तुम्ही कोणत्याही जमिनीचा किंवा घराचा सौदा करू शकता. ऊर्जा पातळी उच्च राहील. सहलीला जाऊ शकता. जीवनसाथीकडून सहकार्य आणि लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता.
अंक 9 - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असेल. व्यवसायात नवीन व्यवहार होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीमध्ये वाद होण्याचीही शक्यता आहे. दिवस व्यस्ततेने भरलेला असेल, विश्रांतीसाठी वेळ मिळणार नाही.