रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (21:55 IST)

Weekly rashifal साप्ताहिक भविष्यफल 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2023

weekly rashifal
मेष 
थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. अचानक धनप्राप्ती होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल.  
 
वृषभ 
नव्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. व्यवसायात चाललेल्या प्रयत्नांना यश येईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने तोंड द्याल. व्यवसाय उद्योगात आपणास विरोध करणार्‍या व्यक्तींकडून लाभ होतील. मेहनतीचे चीज झाल्याने समाधान लाभेल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. भागीदारी व्यवसातून नवीन उपक्रम राबविणे शक्य होईल.  
 
मिथुन 
कर्तव्य भावना ठेवून वागावे. पत्नीचा सल्ला उपयोगी पडेल. जोडीदारांच्या मताचा आपल्यावर पगडा राहील. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. वरिष्ठांशी मर्जी संपादन कराल.वेगवान प्रगती होण्यासाठी आपली जिद्द, महत्वाकांक्षा वाढवावी लागेल. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.  
 
कर्क 
संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उत्तराधर्आत वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.   .
 
सिंह 
या आठवड्यात समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या.सुखस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमणामुळे घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील.  
 
कन्या 
उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल.  
 
तूळ 
आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण आपली आवक वाढविणारे आहे. अचनाक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल.  
 
वृश्चिक 
आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल.  
 
धनु 
कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. अनुकूल घडामोडी घडतील. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. शेजार्‍यांचे सरकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. समाधान लाभेल. आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. स्थितप्रज्ञ राहून महत्त्वाचें निर्णय घ्या.  
 
मकर 
आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.  
 
कुंभ 
प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. तुमचा सरळ स्वभाव आणि मजबूत व्यक्तिमत्व या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडाल. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे.  
 
मीन 
परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. वरीष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्रभ्रमण होत आहे. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील.