Marathi Biodata Maker

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

Updated: शनिवार, 8 एप्रिल 2023 (18:17 IST)
 
मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
 
शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठी आहे.
 
 
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
 
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
 
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
 
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
 
महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो.
 
 
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
 
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
 
शिका !
संघटित व्हा !!
संघर्ष करा !!!
 
मी महिलांनी केलेल्या कामगिरीवरून समाजाची प्रगती मोजतो.
 
एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
 
माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
 
यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.
 
एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
 
कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.
 
मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे.
 
अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
 
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
 
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
 
सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
 
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
 
आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावून पूजा करणे महागात पडले; रेल्वेने प्रवाशाला बाहेर काढले

आईच्या जिद्दीला सलाम! मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉन धावली आणि जिंकली

अमेरिकेच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात इराणवर १२ जण ठार

iPhone 18 Pro हा फोन तीन नवीन रंगांमध्ये येऊ शकतो; काळा रंग परत येण्याची शक्यता

LIVE: मुंबईत रेल्वेने रीलबाजांवर कारवाई करत १० गुन्हे दाखल केले

पुढील लेख
Show comments