Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) संस्था काय काम करते ?

Updated: शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (14:23 IST)
सद्यस्थितीमध्ये सुरु असलेले प्रकल्प
 
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या सामाजिक, आर्थिक शैक्षणिक विकासाबाबत बेंचमार्क सर्वेक्षण
बंगाली नमोक्षुद्र समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण
मेहतर – वाल्मिकी समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अभ्यास
वडार समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अभ्यास
रहाटेनगर नागपूर येथील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण
आंतरजातीय विवाह विषयक कृती संशोधन
R S
संशोधन अहवाल
होलार समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सद्यस्थिती (Click Here to download)
गोसावी समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)
50% पेक्षा जास्त अनु जातींची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमधील सोयी सुविधांचे सर्वेक्षण (Click Here to download)
महाराष्ट्र राज्यातील धोबी समाजाचा अस्पृश्यतेसंबंधी सामाजिक स्थितीचा अभ्यास. (1996) (Click Here to download)
हिंदू खाटिक समाजाची सद्यस्थिती (Click Here to download)
पुणे जिल्ह्यातील मांग गारुडी समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)
मादिगा समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षण (Click Here to download)
कैकाडी समाजाचे क्षेत्रबंधन उठवून विमुक्त जातीतील कैकाडी समाजाचा समावेश अनुसूचित जाती मध्ये करण्याबाबत (Click Here to download)
खालील पैकी विविध प्रशिक्षण कार्यक्रम विभागाच्या विचाराधीन आहेत::
 
मूल्यमापन शाखा
शाखेची माहिती -
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय दुर्बल घटकांसाठी विशेष घटक योजनेंतर्गत विविध योजना राबविण्यात येतात.
दि.07/12/2012 रोजीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत विषय क्रमांक 6 मान्य झाल्यानुसार त्यापैकी काही महत्वाच्या योजनांचे मूल्यमापन या संस्थेमार्फत करण्यात येते. या योजनांचा मूल्यमापन अहवाल शासनास धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त होतो.
 
मूल्यमापनाची उद्दिष्टे
योजना /कार्यक्रमाचे मुख्य उद्देश कितपत  साध्य झाले आहेत ते पाहणे.
योजनेचे लाभार्थी लक्ष गटातील आहे का ते पाहणे.
योजनेअंतर्गत जे सहाय्य दिले जाते ते पुरेसे आहे का ते पाहणे.
योजना राबविल्यामुळे अपेक्षित परिणाम  झाला आहे का ते पाहणे.
योजना अंमलबजावणीमधील दोष, उणिवा, त्रुटी शोधणे व त्यावरील सुधारणा सुचविणे.
 
मूल्यमापनाची कार्यपद्धती
योजनेविषयीची प्राथमिक माहिती (Primary Data Collection) सर्व जिल्हयांकडून प्राप्त करून घेतली जाते.
नमुना निवड करणे (Sampling) :- प्राथमिक माहितीच्या आधारे लाभार्थी निवड केली जाते.
प्रपत्र (Questionnaire) तयार करणे :- योजनेच्या / मूल्यमापनाच्या उद्दष्टिनुसार प्रपत्र तयार करण्यात येते.
पथदर्शी सर्वेक्षण (Pilot Survay) :- तयार केलेल्या प्रपत्रातील माहितीची चाचणी घेतली जाते.
प्रपत्र अंतिम करणे :- पथदर्शी सर्वेक्षणामध्ये आढळून आलेल्या सुचनेनुसार प्रपत्र अंतिम करण्यात येते.
अंतिम प्रपत्रामध्ये माहितीचे संकलन :- निवडलेल्या योजना/ लाभार्थी /संस्था यांची क्षेत्रीय पाहणी करून माहिती संकलित केली जाते.
माहिती नोंदणी :- प्रपत्रातील माहितीला संकेतांक देऊन माहितीची नोंदणी संगणकावर करण्यात येते.
माहितीचे पृथ्थ‍:करण :- नोंदविलेल्या माहितीचे पृथ्थ‍:करण व तक्तीकरण करण्यात येते.
अहवाल लेखन :- पृथ्थ:करण व तक्तीकरणाच्या आधारे अहवाल लेखन करण्यात येते आणि सदर अंतिम अहवाल मा. महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मंजूरीस सादर करण्यात येतो.
मा. महासंचालक यांचे मान्यतेनंतर मूल्यमापन अहवाल शासनास व मा. आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय यांना सादर करण्यात येतो.
मुल्यमापन कक्षामार्फत पूर्ण झालेले मूल्यमापन अहवाल
रमाई घरकुल योजना (ग्रामीण विभाग)
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जातीच्या 50 मुला-मुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय अनुदानित वस्तीगृहांना सहाय्य अनुदान योजना
अनुसचित जाती व नवबौध्द घटकांतील उमेदवारांना मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
विजाभज, इमाव व विमाप्र घटकांतील उमेदवारांना मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना
आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान योजना
गटई कारागीरांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना
 
मुल्यमापन सुरू असलेल्या योजना
अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
रमाई आवास योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेबाबत जिल्हानिहाय माहिती संकलन करून धोरणात्मक अहवाल सादर करणे
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याना विद्यावेतन योजना
बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करणे. (अधिछात्रवृत्ती योजना BANRF)
ऊसतोड कामगारांना आधुनिक उपकरणे उपलब्ध होणेबाबत
 
भविष्यात मुल्यमापनासाठीच्या योजना
शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
बार्टीच्या योजनांचे मूल्यमापन करणे
विशेष घटक योजनेअंतर्गत कृषी खात्याच्या योजना
इतर विभागाच्या योजनांचे मुल्यमापन करणे
शासकीय अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण संस्था
About Projects संस्थेमार्फत खालील प्रकारचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केले जातात.
 
पायाभुत प्रशिक्षण कार्यशाळा
उजळणी प्रशिक्षण
नविन विषयाची ओळख प्रशिक्षण
पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण
तांत्रिक प्रशिक्षण
R S
Project 1
मा. आयुक्त, समाज कल्याण यांच्या आस्थापनेवरी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमतावृध्दीसाठी आवश्यक्तेनूसार पायाभूत, उजळणी, पदोन्नतीनंतर प्रशिक्षण कार्यशाळा.
Project 2
अपंग कल्याण, आयुक्तालय व विजाभज कल्याण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमतावृध्दीसाठी आवश्यक्तेनूसार पायाभूत, उजळणी, पदोन्नतीनंतर प्रशिक्षण कार्यशाळा.
Project 3
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील मागासवर्गीय लोकप्रतिनिधींना सामाजिक न्याय विभागातील विविध योजनांच्या महितीकरीता प्रशिक्षण देणे.
Project 4
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे.
 
Achievements
सन 2012-13 ते 2011-22 पर्यंत एकुण 145 उजळणी व पायाभूत कार्यशाळा घेण्यात आल्या असून, 6,828 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामध्ये समाज कल्याण, अपंग कल्याण व विजाभज कल्याण संचालनालयाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक गृहपाल, समाजकल्याण निरिक्षक, सहाय्यक शिक्षक व मुख्याध्यापक तसेच मतीमंद बालगृह कर्मचारी, शिपाई यांचा समावेश आहे.
 
जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग विभाग जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग
विभागाची माहिती
महाराष्ट्र अधिनियम क्र.XXIII व्या अंतर्गत  २००१ आणि २०१२ अन्वये सर्व जातीचे प्रमाणपत्र छाननी करणे , समित्यांवर देखरेख ठेवणे  आणि समन्वय साधणे, यासाठी  BARTI ने २९.०८.२०१२ च्या जी.आर.नुसार  महासंचालकाची मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. तो समित्यांच्या कामाचा आढावा घेणे,
आर्थिक  सहाय्यकाची तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविणे ,सदस्यांसाठी कार्यशाळा व  प्रशिक्षण व्यवस्था करणे ,सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र देणे ही कामे'करतो.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

SBI ग्राहकांना महत्त्वाची सूचना जाहीर! वाचा

'वंदे मातरम'ऐवजी लता मंगेशकर यांचे गाणे वाजवल्याने एकनाथ शिंदे नाराज; संजय निरुपम यांची काँग्रेसवर टीका

LIVE: मुंबईतील 'बेस्ट'च्या ताफ्यात १५० नवीन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस सामील होणार

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपये पॉकेटमनी मिळण्याची शक्यता! राज्य सरकारचा नवा प्रस्ताव

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका; कळंब नगरपरिषदेचे १० नगरसेवक भाजपच्या वाटेवर

पुढील लेख
Show comments