Daily Horoscope
✕

नव्या जोडीदारात आपण आपल्या 'एक्स'ला शोधतो का?

Updated: बुधवार, 31 जुलै 2019 (10:14 IST)
 
9 वर्षांनंतर या संशोधनात केवळ 332 अशा व्यक्ती उरल्या ज्या कमीत कमी 2 रोमँटिक नात्यात गुंतल्या होत्या. इतक्या मोठ्या सर्व्हेमध्ये केवळ 332 व्यक्तीच एकाहून जास्त रोमँटिक नात्यात असणं, आश्चर्याची बाब होती. मात्र, यावरून संशोधक ठोस निष्कर्षावर येऊ शकले. या 332 लोकांनी त्यांच्या वर्तमान जोडीदाराची तिच वैशिष्ट्यं सांगितली जी त्यांच्या जुन्या पार्टनरमध्ये होती.
 
याचा अर्थ असा होता की संशोधनात सहभागी असणाऱ्या व्यक्तींना हे वाटत असलं की आपल्या जोडीदाराविषयी असलेल्या त्यांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. तरी वास्तवात मात्र, ते आपल्या जोडीदारात विशिष्ट गुण शोधत होते आणि हा गुण त्यांना त्यांच्या पहिल्या जोडीदारात मिळाला होता आणि दुसऱ्या जोडीदारातही मिळाला आणि याच गुणामुळे ते दुसऱ्या पार्टनरशी जुळवून घेऊ शकले.
 
'आपल्या टाईप'चा जोडीदार का शोधतो?
तुम्हाला ही बाब मान्य होवो अथवा न होवो, एक गोष्ट मात्र खरी आहे. तुम्ही जोडीदार शोधत असाल तर असं होऊ शकतं की तुम्ही अशी व्यक्ती शोधता जिच्यात तुमच्या पहिल्या म्हणजेच तुमच्या 'एक्स'चेच गुण असतील आणि तसे स्वभावगुण असलेली व्यक्ती तुम्हाला सापडल्यावर तुमचं तिच्याशी सहज सूत जुळतं.
 
विशेष म्हणजे जर्मनीत जे संशोधन झालं त्यात जोडीदाराचे गुण तर जुळलेच. मात्र, अनेकांचे तर जोडीदारही तेच होते. म्हणजेच जुनेच.
 
आपल्या जोडीदारात आपल्यासारखेच गुण शोधणं असामान्य बाब नाही. आपल्या सर्वांचंच आपल्या आसपासच्या त्याच व्यक्तींशी पटतं ज्यांच्याशी आपले विचार आणि आपल्या सवयी जुळतात. अशा संबंधांमध्ये तुम्हाला तुमचे विचार आणि सवयी बदलायची गरज पडत नाही.
 
असं असलं तरी काही लोक असे असतात जे नवनवीन प्रयोग करण्यासाठी वेगवेगळ्या जोडीदारांसोबत वेळ घालवून त्यांना आजमावतात. संशोधनात असंही आढळलं की बहिर्मुखी म्हणजेच सोशलायझर व्यक्तींची त्यांच्याचसारख्या स्वभावाच्या व्यक्तीशी सूत जुळण्याची शक्यता खूप कमी असते.
 
एकूण काय तर, आपण आपल्या विचारांशी सहमत असणाऱ्या व्यक्तीशी नातं जोडलं आणि आपण खुल्या विचारांचे असू तर आपण आयुष्यात नवनवीन जोडीदारांचाही अनुभव घेऊ शकतो, जेणेकरून जगाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन आपल्याला मिळू शकेल.
 
संशोधनाचा फायदा
या संशोधनामुळे ऑनलाईन डेटिंगसाठीही नव्याने आशा निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ संगीत ऐकवणारे अॅप तुम्हाला तुमच्या आवडीचं संगीत ऐकवतात. अगदी त्याच पद्धतीने डेटिंग अॅपदेखील तुम्हाला तुमच्या स्वभावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीच तुम्हाला सुचवतील.
 
मात्र, अशी नाती किती काळ टिकली, हे या संशोधनातून कळलेलं नाही. त्यामुळे एखादं नातं किती दिवस टिकेल, याची काहीच खात्री देता येत नाही.
 
आपल्या जोडीदाराशी अनेक बाबतीत असलेलं साधर्म्य तुमच्या विकासात अडथळा ठरू शकतो. तुम्हाला भेटण्याआधी तुमच्या जोडीदाराचं जुनं नातं असेल तर तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं. कारण नव्या जोडीदाराचे गुण जुन्या जोडीदाराशी जुळणारे असतील तर हे तुमच्यासाठी काळजीचं आणि खेदकारकच म्हणावं लागेल.
 
हेच सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर असंही म्हणू शकता की तुमच्या विद्यमान जोडीदाराचा स्वभाव तुमच्या पहिल्या जोडीदाराशी जुळणारा असेल तर त्याच्याशी घट्ट नातं निर्माण करणं, तुलनेने सोपं जाईल.
 
त्यामुळे आता वाढत्या घटस्फोटांसाठी याला दोष देऊ नका की लोकांना 'त्यांच्या टाईप'चा जोडीदार मिळाला नाही.
 
तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा शोध घेणं थांबवायला हवं, असा या संशोधनाचा अर्थ अजिबात काढू नका. काहीही असलं तरी जोडीदाराची निवड करताना अनेक मुद्दे महत्त्वाचे असतात आणि अनेक मुद्द्यांचा परिणाम होत असतो.
 
मात्र, तुमचं नवं 'रिलेशनशीप स्टेटस' पहिल्यासारखंच असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, एवढंच हे संशोधन सांगतो.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments