Festival Posters
✕

पाच प्रसिद्ध सुंदर तलाव राजस्थान

Updated: शनिवार, 8 मार्च 2025 (15:43 IST)
राजस्थान हे भारतातील एक सुंदर आणि ऐतिहासिक राज्य आहे. हे त्याच्या शाही वारशासाठी, भव्य किल्ल्यांसाठी आणि वाळवंटाच्या दृश्यांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. तसेच येथील संस्कृती आणि सुंदर दृश्ये पाहण्यासाठी केवळ देशीच नाही तर परदेशी पर्यटक देखील येथे येतात. राजस्थानची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची समृद्ध संस्कृती, रंगीबेरंगी बाजारपेठा, पारंपारिक लोकनृत्य-संगीत आणि राजवाडे, जे त्याला अद्वितीय बनवतात. पण किल्ल्यांसोबतच येथील सुंदर तलावही लोकांना आकर्षित करतात. तसेच आज आपण राजस्थानमधील पाच प्रसिद्ध तलाव पाहणार आहोत. तुम्ही राजस्थान फिरायला जात असाल तर या तलावांना नक्की भेट द्या.

पिछोला तलाव-
पिछोला तलाव हे राजस्थानदमधील उदयपूर मध्ये आहे. तसेच  हे ठिकाण टेकड्यांनी वेढलेले आहे आणि जवळील राजवाडे आणि घाट आकर्षक आहे. हा या तलावाचे क्षेत्रफळ अंदाजे ६.९६ चौरस किमी आहे. तसेच जग मंदिर आणि लेक पॅलेस तलावाच्या मध्यभागी बांधलेले आहे, ज्यामुळे ते खूप सुंदर बनते. तुम्ही त्याच्या सभोवताल साहसी क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकता.

सांभर तलाव-
हा तलाव जयपूर आणि नागौर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. हा तलाव भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावांपैकी एक मानला जातो. तसेच हा तलाव अंदाजे २३० चौरस किमी क्षेत्रात पसरलेला आहे.
ALSO READ: प्राचीन उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या भुवनेश्वर
राजसमंद तलाव-
हा तलाव राजसमंद शहरात स्थित आहे. या तलावावर संगमरवरी पायऱ्या आणि सुंदर सूर्यास्ताचे दृश्य पर्यटकांना अगदी भुरळ घालते. हे एक शांत ठिकाण आहे. तसेच हा तलाव अंदाजे ७.७ चौरस किमी मध्ये पसरलेला आहे. हे भारतातील सुंदर तलावांपैकी एक आहे.

नाक्की तलाव-
हा तलाव माउंट अबू येथे स्थित आहे. तसेच हा तलाव हे अरावली टेकड्यांमध्ये वसलेले आहे. म्हणून तुम्हाला येथे भेट द्यायला आवडेल. येथून हिरव्यागार दऱ्यांचे दृश्य चांगले दिसते. हा तलाव अंदाजे ०.५ चौरस किमी मध्ये पसरलेला आहे.तसेच हा तलाव रोमँटिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध मनाला जातो.
ALSO READ: जगातील सातवे सर्वात मोठे बेट Mallorca
फतेह सागर तलाव-
हा तलाव उदयपूरमध्ये आहे. तसेच हे बोटिंगसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. हा तलाव अंदाजे ४ चौरस किमी मध्ये पसरलेला आहे. येथून तुम्हाला नेहरू गार्डन आणि उंच टेकड्यांचे सुंदर दृश्य पाहता येईल.

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

कॉपी स्क्वॉड' फेम दिग्दर्शक बेलराज कलारिकल यांचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन

कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचा इतिहास काय? रामकृष्ण परमहंसांशी असलेले नाते जाणून घ्या

यामी गौतमच्या 'नयी नवेली' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

पुढील लेख
Show comments