शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 जानेवारी 2025 (08:51 IST)

भारतातील पाच प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर

Mahalkshmi devi
महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर
महाराष्ट्रातील कोल्हापुरात असलेले महालक्ष्मी मंदिर हे जागृत प्रसिद्ध मंदिर मानले जाते. अंबाबाई नावाने देखील देवीआई महाराष्ट्रात पूजली जाते. तसेच हे मंदिर 7 व्या शतकातील चालुक्य वंशाचा शासक कर्णदेव याने बांधले होते. प्रचलित आख्यायिकेनुसार येथील लक्ष्मी मूर्ती सुमारे 7,000 वर्षे जुनी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सूर्यदेव स्वतः आपल्या किरणांनी लक्ष्मीला अभिषेक करतात. तसेच सूर्यकिरण देवीच्या चरणांची पूजा करतात. कोल्हापूर मधील अंबाबाईच्या मंदिरात शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात भव्य आणि दिव्या साजरे केले जाते.   
 
mahalskhmi munbai
महालक्ष्मी मंदिर, मुंबई
महाराष्ट्रातील मुंबई मध्ये असलेले  महालक्ष्मी मंदिर हे या शहरातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. तसेच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर लाखो लोकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते.  येथे दररोज हजारो भाविक देवी आईच्या दर्शनासाठी जमतात. महालक्ष्मी मंदिरात देवी महालक्ष्मीसोबतच महाकाली आणि महासरस्वतीची देखील मूर्ती आहे. येथे आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील असा भाविकांचा ठाम विश्वास आहे. तसेच नवरात्रीमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेतात. 
 
Padmavathi devi
पद्मावती मंदिर, तिरुचुरा
आंध्र प्रदेशात तिरुपतीजवळ तिरुचुरा गावात पद्मावती देवीचे सुंदर जागृत मंदिर आहे. असे मानले जाते की तिरुपती बालाजीच्या मंदिरात केलेल्या मनोकामना तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा भाविक बालाजीसह देवी पद्मावतीचा आशीर्वाद घेतात. तसेच पौराणिक आख्यायिकेनुसार या मंदिराच्या तळ्यात फुललेल्या कमळाच्या फुलापासून पद्मावती देवीचा जन्म झाला होता. नवरात्रीमध्ये या मंदिरात अनेक भक्त देवीआईचे दर्शन घेतात. 
 
mahalskhmi indore
महालक्ष्मी मंदिर, इंदूर
मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेले श्री महालक्ष्मी मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. मल्हारराव होळकर (द्वितीय) यांनी 1832 मध्ये हे मंदिर बांधले होते. तसेच येथे दररोज हजारो भाविक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. तसेच या प्राचीन महालक्ष्मी मंदिरातील सजवलेल्या मूर्तीला खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्री मध्ये देवी आईला विशेष शृंगार केला जातो. 
 
lakshminarayan
लक्ष्मीनारायण मंदिर, नवी दिल्ली
नवी दिल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिरात देवी लक्ष्मी भगवान विष्णूंसोबत विराजमान आहे. तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार 1938 मध्ये उद्योगपती जी. हे डी. बिर्ला यांनी केला होता. जे मूळतः वीरसिंह देव यांनी 1622 मध्ये बांधले होते. तसेच हे अतिशय जागृत मंदिर मानले जाते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित असलेल्या या मंदिरात नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. येथे भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. असे मानले जाते.