बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

पर्यटन स्थळे, सीता मंदिर, राम मंदिर

देशातील एकमेव सीता मंदिर मध्यप्रदेशात
भारतात देवळे व मंदिरांची लयलूट असली तरी रामाचे मंदिर म्हणजे सीताराम मंदिर असेच मानले जाते. सीतेचा समावेश पंचकन्यांमध्ये होत असला तरी देशात सीतेचे स्वतंत्र मंदिर पाहायला मिळत नाही. मध्यप्रदेशाच्या अशोकनगर जिल्ह्यातील  करिला या छोट्या गावात सीतामाईचे मंदिर असून हे देशातील बहुदा एकुलते एक मंदिर असावे असे म्हटले जाते. विशेष म्हणजे रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर ती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येऊन राहिली व येथे तो आश्रम होता असेही म्हटले  जाते. येथेच सीतेने लव व कुश यांना जन्म दिला होता असेही मानले जाते.
 
रंगपंचमी दिवशी या छोट्याशा गावात प्रचंड मोठी जत्रा भरते. राजस्थान, उत्तरप्रदेशातून सुमारे २५लाख भाविक येथे दर्शनासाठी तसेच नवसफेडीसाठी येतात. असे सांगितले जाते की या मंदिरात सीतेचे दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त करायची.  इच्छा पूर्ण झाली की पुन्हा दर्शनासाठी यायचे व नवसफेडीसाठी बेडनींचे नृत्य ठेवायचे. या भागातील बेडिया या जमातीचा उदरनिर्वाह नाच गाणी करूनच चालतो व रंगपंचमीलाच हा नवसफेडीचा सोहळा होतो त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी या गावाचा  सारा नूरच पालटलेला असतो.