शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : शुक्रवार, 31 जुलै 2020 (14:26 IST)

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
 
1 अयोध्यांचे घाट : अयोध्यांचे घाट आणि देऊळांचे एक प्रख्यात शहर आहे. शरयू नदी इथूनच वाहते. शरयू नदीच्या तीरे 14 मोठे घाट आहे यामध्ये गुप्तद्वार घाट, कैकेयी घाट, कौशल्यं घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट इत्यादी उल्लेखनीय आहेत.
 
2 राम जन्मस्थळ : अयोध्यामध्ये प्रामुख्याने राम जन्मस्थळीचे दर्शन केले जाते, इथेच रामलला वसलेले आहे.
 
3 मारुतीचे देऊळ : अयोध्याचा मध्यभागी हनुमान गढीतील रामभक्त मारुतीचे मोठे देऊळ आहे.

4 दंतधावण कुंड : हनुमान गढी क्षेत्रात दंतधावण कुंड आहे जिथे श्रीराम आपले दात स्वच्छ करीत असत. याला राम दतौन असे ही म्हणतात.
 
5 कनक भवन देऊळ : अयोध्येचा कनक भवन देऊळ बघण्या सारखे आहे जेथे राम आणि जानकीच्या सुंदर मुरत्या ठेवलेल्या आहेत.
 
6 राजा दशरथाचे राजवाडे : इथे राजा दशरथाचे राजवाडे देखील अगदी प्राचीन आणि मोठे आहेत.
 
7 भगवान ऋषभदेव यांचे जन्मस्थळ : अयोध्येत एक दिगंबर जैन देऊळ आहे जेथे ऋषभदेवांचे जन्म झाले होते. अयोध्येत आदिनाथाच्या व्यतिरिक्त अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतिनाथ आणि अनंतनाथ यांचे जन्म देखील इथेच झाले असे. इथेच यांची जन्मस्थळीवर देऊळ देखील बांधली गेली आहेत.

8 बौद्धस्थळ : अयोध्येच्या माणिपर्वतावर बौद्ध स्तूपांचे अवशेष आहे. असे म्हणतात की भगवान बुद्धाची मुख्य उपासक विशाखा यांनी बुद्धांच्या सानिध्यात अयोध्येत धम्मची दीक्षा घेतली. याची आठवण म्हणून विशाखाने अयोध्येत माणिपर्वताच्या जवळ बौद्ध विहार स्थापित केले. असेही म्हटले जाते की बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांचे दात या मठातच ठेवले होते. वास्तविक, सातव्या शतकात चिनी प्रवासी हेनत्सांग इथे आले होते. त्यांचा मतानुसार इथे 20 बौद्ध देऊळे होती आणि सुमारे 3000 भिक्षुक वास्तव्यास होते आणि येथे हिंदूंचे एक मुख्य आणि मोठे देऊळ होते.

9 नंदीग्राम : अयोध्येपासून 16 मैलावर नंदीग्राम आहे जेथे राहून भरताने राज्य केले. येथे भरत कुंड तळ आणि भरतजींचे देऊळ आहे.
 
10 श्री ब्रह्मकुंड : अयोध्येत असलेल्या गुरुद्वारा ब्रह्मकुंड साहिबच्या दर्शनास जगाच्या कानाकोपऱ्यातून शीख भक्त येतात. असे म्हणतात की शीख समुदायाचे पहिले गुरु नानकदेव, 9 वे गुरु तेग बहादूर आणि 10 वे गुरु गोविंदसिंह यांनी ब्रह्मकुंडात ध्यान केले होते. पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्माने 5000 वर्षापर्यंत या जागे जवळ तपश्चर्या केली होती. गुरुद्वारा ब्रह्मकुंडामध्ये असलेल्या एकी कडे गुरु गोविंद सिंहजीच्या अयोध्या येण्याच्या कथांशी निगडित चित्रे आहेत तरी दुसरी कडे त्यांची निहंग सैन्याची शस्त्रे देखील आहेत. ज्यांचा बळावर त्यांनी मुघलांच्या सैन्याशी रामजन्मस्थळाच्या रक्षणासाठी युद्ध केले.

11 इतर तीर्थ क्षेत्र : या व्यतिरिक्त सीतेचे स्वयंपाकघर, चक्र हरजी विष्णूंचे देऊळ त्रेताचें ठाकुर, रामाची पौढी, जनौरा, गुप्तारघाट, सूर्यकुंड, सोनखर, शरयू पलीकडील छपैया गाव, शरयू तीरे दशरथ तीर्थ, नागेश्वर देऊळ, दर्शनेश्वर देऊळ, मोतीमहाल फैजाबाद, गुलाब-बाडी- फैजाबाद आणि तुळस चौरा हे स्थळ प्रेक्षणीय आहे.