Biodata Maker marathi
✕

अव्यवस्थांच्‍या 'जात्यात' वरूण गांधी

Updated: बुधवार, 17 फेब्रुवारी 2010 (14:38 IST)
इंदूरमध्‍ये सुरू असलेल्‍या भाजपच्‍या राष्‍ट्रीय अधिवेशनासाठी आलेले युवा नेते वरूण गांधी यांना अधिवेशनस्थळी आल्‍यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या युवा नेत्याजवळ युवक आणि पदाधिका-यांची गर्दी असली तरीही त्‍यांना त्यांच्‍या अडचणी दूर करण्‍यासाठी बराच वेळ वाट पहावी लागली.

वरूण गांधी यांचे अधिवेशन स्‍थळी आगमन झाल्‍यानंतर त्यांना त्‍यांच्‍या निवास व्यवस्थेबद्दल माहिती देणारे कुणीही नव्‍हते. कशीबशी त्‍यांना निवास व्‍यवस्‍था कळल्‍यानंतर त्यांना नियोजित ठिकाणी नेण्‍यासाठी वाहन व्‍यवस्‍था उपलब्‍ध होऊ शकली नाही.
थोड्या वेळानंतर स्वागतस्थळाजवळ लालकृष्ण अडवाणी, भाजपाध्यक्ष नितिन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्वराज यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्वलन झाले तिथेही त्यांच्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आले. वरूण यांच्‍या सोबत कुणीही मोठा नेता बोलतानाही दिसला नाही.

दीपप्रज्वलनानंतर सर्व नेत्यांना नेण्‍यासाठी गाड्या आल्‍या मात्र त्यात वरुणसाठी जागा नव्‍हती. प्रमुख नेते गाड्यांमध्‍ये बसून गेले पण वरुणला कुणी काहीही विचारले नाही.

सर्व नेते निघून गेल्‍यानंतर वरूण गांधी यांच्‍यासाठी गाडी नसल्‍याचे कार्यकर्त्यांच्‍या लक्षात आले मात्र त्‍यांना ते करणे शक्य होऊ शकले नाही. या सर्व प्रकारामुळे वरुणच्‍या चेह-यावर नाराजी स्‍पष्‍टपणे दिसत होती.

गाडीकडे जाताना त्यांनी त्यांच्‍या पक्षातील एका मित्राशी या संदर्भात इंग्रजीतून नाराजी व्‍यक्त केली. मात्र माध्‍यमांनी त्यांना या संदर्भात विचारले असता त्यावर भाष्‍य करण्‍याचे वरुणने टाळले.

लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाचे कार्ड खेळणा-या वरुणमुळे पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पराभवाचे खापरही पक्षाने वरूणच्‍याच माथी फोडले त्‍यामुळे तेव्‍हापासूनच पक्षाने वरुणकडे दुर्लक्ष करण्‍यास सुरूवात केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

‘मी २०१४ पासून मंत्री बनत आहे!’; एनडीए प्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

५ कोटींच्या लाचेचा आरोप: अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीवरून संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांवर निशाणा

दाऊद इब्राहिमच्या मुसाफिरखाना ठिकाण्यातील नमाजवरही बंदी; 'कोणीही आत जाऊ नये', बॉम्बे हायकोर्टाचे आदेश

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय: ४२ लाख शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य, सिंचनासाठी ५,५४८ कोटी

इराणमध्ये 'ऑनर किलिंग': प्रेमसंबंधांमुळे १९ वर्षीय गर्भवती मुलीची हत्या; आई-वडील अटकेत

Show comments