’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित सिनेमा भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर 2021 मध्ये भूलभुलैया-2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयकुमारच्या भूलभुलैया या सिनेमाचा हा दुसरा भाग आहे. मात्र या सिक्वलमध्ये अक्षयकुमारऐवजी कार्तिक आर्यन मुख्या अभिनेत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तब्बूची या सिनेमात विशेष भूमिका पाहायला मिळणार आहे. चित्रपट समीक्षक आदर्श यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनची झळ सिनेसृष्टीलादेखील बसली आहे. त्यामुळे अनेक सिनेमांच चित्रीकरण रखडलं. यात भूलभुलैया-2' सिनेमाचाही नंबर लागतो. हा सिनेमा जुलै 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. यांनी शेअर केलेल्या फोटोत कार्तिकचा सिनेमामधील लूक दिसून येतो. भगवी वस्त्र आणि खांद्यावर झोळी घेतलेल्या कार्तिकचा लूक पहिल्या भागातील अक्षयकुमारच्या लूकसारखाच आहे. अक्षच्या भूलभुलैया'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आता कार्तिक आर्यनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते का हे जाणून घेण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.