शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2024 (14:35 IST)

सर्वोच्च न्यायालयाकडून राखीला मोठा धक्का, होणार तुरुंगवास!

राखी सावंत आणि वादांशी तिचे नाते जुने आहे. ती नेहमी आपल्या कृती आणि वक्तव्यांमुळे कोणत्या न कोणत्या वादात अडकत असते. राखी पासून घटस्फोट घेतल्यानंतर आदिल ने सोमी खानशी लग्न केले. राखी आणि आदिल मध्ये कायदेशीर लढाई अजून देखील सुरु आहे. 

आता राखीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने अभिनेत्रींच्या विरोधात निकाल दिल्यामुळे तिला तुरुंगवास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने अभिनेत्रीची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. अभिनेत्रीवर तिच्या माजी पती आदींचा आक्षेपार्ह व्हिडीओ लीक केल्याचा आरोप आहे. अदिलने व्हिडीओ लीक केल्याचा आरोप करत अभिनेत्रींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 
 
मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अभिनेत्रीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना मोठा धक्का बसला आहे. आता, केवळ अटकपूर्व जामीनासाठीची तिची याचिका फेटाळली नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने राखी सावंतला 4 आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. म्हणजेच आता 4 आठवड्यांच्या आत राखी सावंतला कनिष्ठ न्यायालयात आत्मसमर्पण करावे लागणार आहे. जर तिने हे केले नाही तर तिच्या समस्या आणखी वाढू शकतात. राखी कडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ती यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागेल. 
 
Edited By - Priya Dixit