ganesh chaturthi

काजोलला पसंत नव्हता अजयचा स्वभाव, नंतर असे पडले प्रेमात

Updated: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (14:34 IST)
 
शाहरुख खानसोबत काजोलची जोडी ऑनस्क्रीन आवडते पण खऱ्या आयुष्यात लोक अजय आणि काजोलच्या जोडीची उदाहरणे देतात. 24 फेब्रुवारी 1999 रोजी दोघांचे लग्न झाले. दोघांची पहिली भेट हलचल चित्रपटाच्या सेटवर झाली होती. स्वभावाने बबली, काजोलला सेटवर बोलणे आणि विनोद करणे आवडते. दुसरीकडे अजय देवगण शांत स्वभावाचा होता. त्यावेळी काजोलचा स्वभाव त्याला आवडला नाही.
 
अजय देवगणने एका मुलाखतीत सांगितले होते की, पहिल्यांदा त्याला काजोल खूप अहंकारी वाटली पण हळूहळू दोघांची मैत्री झाली. असे म्हटले जाते की, तेव्हा काजोल दुसऱ्या कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होती. ते नाते तुटल्यावर अजय देवगणने तिला मित्राप्रमाणे सांभाळले. त्यानंतरच दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काजोलचे लग्न झाले तेव्हा ती बॉलिवूडच्या टॉप हिरोईनपैकी एक होती. त्याचवेळी अजय देवगणचा पहिला चित्रपट हिट ठरला होता. काजोलने 24 व्या वर्षी अजय देवगणसोबत लग्न केले. या लग्नाला काही खास लोकांनीच हजेरी लावली होती.
 
त्याचवेळी अजय देवगणने काही दिवसांपूर्वी एक मीमही शेअर केला होता. ज्यात त्याने सांगितले की, यावेळी मी विसरणार नाही. यावेळी अजयने आपल्या पत्नीचा एक क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणत आहे की, तो स्वत:ला भाग्यवान समजतो की काजोल त्याच्या आयुष्यात आली. काजोल अजूनही त्याच्यासोबत आहे याचे त्याला आश्चर्य वाटते. हे ऐकून काजोल भावूक झाली. व्हिडिओचे कॅप्शनही खूप रोमँटिक आहे. अजयने 1999 मध्ये लिहिले - प्यार तो होना ही था, 2002 प्यार तो हमेशा है!
 
बॉलिवूडमध्ये अनेकदा असे पाहायला मिळते की, लग्नानंतर अभिनेत्री चित्रपटात काम करणे बंद करतात, मात्र काजोलने हा समज मोडला. लग्नानंतर काजोलने 'माय नेम इज खान', कभी खुशी कभी गम, फना सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अजय आणि काजोल यांना न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत.

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments