शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मार्च 2021 (16:46 IST)

आलिया भट्टच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट, 'आरआरआर'हून एक्ट्रेसचा फस्ट लुक रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या वाढदिवसानिमित्त तिचा 'आरआरआर' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. आलिया एस.एस. राजामौलीच्या चित्रपटाद्वारे साऊथ सिनेमामध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार आहे.
 
चित्रपटाच्या पहिल्या लुकमध्ये आलिया भट्ट मंदिरामध्ये ग्रीन कलरची साडी आणि रेड ब्लाऊज परिधान करून बिंदी घालून बसलेली दिसली आहे. यात ती एथनिक लुकमध्ये दिसली आहे.
 
ह्या लूकला जारी करताना चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवर लिहिले होते की, 'प्रतीक्षा संपली आहे. सीतेच्या भूमिकेत आलियाचा पहिला लुक. आलियाला   वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
चित्रपटाविषयी बोलताना आलिया भट्ट साऊथ सुपरस्टार राम चरण तेजाच्या अपोजिट  ब्लास्ट करणार आहे. असं म्हटलं जात आहे की आलिया भट्ट चित्रपटात फक्त एक कॅमिओ करणार आहे जी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
 
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर आलिया भट्ट सध्या संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट असलेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये खूप व्यस्त आहे. याशिवाय आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर कपूरसोबत रोमांस करताना दिसणार आहे.