रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (09:25 IST)

बच्चन यांनी केली वर्सोवा बीचवर साफसफाई

महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वर्सोवा बीचवर चक्क साफसफाई करताना दिसले. अमिताभ यांनी बीचवरील कचरा उचलून स्वच्छता केली. एका संस्थेने दिलेल्या निमंत्रणावरून ते आले होते. 

जेव्हा ते बीचवर पोहोचले तेव्हा त्यांनी बघितले की, याठिकाणी खूप कचरा आणि पॉलिथीन पडलेले आहे. मग, स्वत: अमिताभ यांनी बीचवर जात साफसफाई केली. तब्बल अर्धा तास त्यांनी साफसफाई केली. स्वत: महानायक स्वच्छता करीत असल्याचे बघून परिसरातील मुलांनीही या अभियानात सहभाग घेतला. यावेळी अमिताभ यांनी मुंबईकरांना म्हटले की, ‘प्रत्येकवेळी आणि प्रत्येक गोष्टीसाठी बीएमसीला दोष देण्यात काही अर्थ नाही. आपल्याला आपली जबाबदारी समजायला हवी. जर तुम्हाला कचरा दिसत आहे, तर बीएमसीच्या कर्मचाºयांची प्रतीक्षा न करता स्वत:हून साफसफाई करायला हवी’. अमिताभ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी साफसफाईसाठी मदत व्हावी म्हणून एक जेसीबी आणि एक टॅक्टर देणार असल्याचेही सांगितले.