शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (15:50 IST)

Animal Trailer 'एनिमल'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, खतरनाक अवतारात रणबीर कपूर

Animal Movie Trailer बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'अ‍ॅनिमल'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच प्रेक्षणीय आहे आणि त्यात रणबीर कपूरचा इंटेन्स लुक खूपच प्रभावी आहे. 'ऑनिमल'ची कथा प्रेक्षकांची मने जिंकेल, असे ट्रेलर पाहून वाटते.
 
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूरचे वडील अनिल कपूरसोबतचे बॉन्डिंग दिसत आहे. अॅनिमलचा ट्रेलर रॉ आणि डॉर्क आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला रणबीर एक साधा मुलगा असल्याचं दाखवण्यात आलं आहे, पण नंतर तो बिघडतो. रणबीरचे त्याच्या वडिलांसोबतचे नाते खूपच गुंतागुंतीचे दिसते.
 
आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी, रणबीर अशा मार्गावर निघतो जिथून जिवंत परतणे खूप कठीण आहे. ट्रेलरमध्ये रणबीर कपूर लहानपणापासून तरूणपणापर्यंत आणि वृद्धापकाळापर्यंतच्या भूमिकांमध्ये दिसत आहे. प्रत्येक पात्रात तो खूप दमदार दिसतो.
 
रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूर यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. याशिवाय बॉबी देओलही अतिशय खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात रणबीर आणि बॉबी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
 
'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. चित्रपटाला CBFC कडून 'A' प्रमाणपत्र मिळाले आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.