आलिया जपतीये नात्याचा बंध
बॉलीवूडमध्ये नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असणारी आलिया भट्ट सध्या चित्रीकरणातून खास वेळ काढून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये रंगली आहे.
बॉलीवूड कलाकरांच्या सेलिब्रेशनचा एक वेगळा रंग आलियाने दाखवून दिला. आलिया सध्या खास व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये दंग आहे. आलियाने या सेलिब्रेशनमधून नातेसंबंधातील आदर्शाचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
सोशल माध्यमाच्या जगात आई-वडील आणि मुलांच्या नात्यातील वाढणारे अंतर याच माध्यामातून कमी करता येऊ शकते, असा संदेश आलियाने दिल्याचे दिसते. आलियाच्या जीवनातील ही खास व्यक्ती म्हणजे तिची आजी आहे. 'बद्रिनाथ की दुल्हनिया' या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून आलियाने आजीसाठी खास वेळ दिला.