सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बाहुलबली 2 ची एक तिकट 2400 रूपयाची

बहुप्रतिक्षित बाहुलबली- २ चित्रपट येत्या 28 एप्रिलला रिलीज होतआहे. मात्र त्याआधीच या चित्रपटाचे हाऊसफुल्ल बुकिंग झाले आहे. देशभरातील मेट्रो शहरातील बहुतेक थिएटर्समधील तिकीट हाऊसफुल्ल झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या विकेंडमधील तिकीटांवर चाहत्यांनी उड्या मारल्या आहेत. परंतू सर्वात आश्चर्यची बाब म्हणजे दिल्ली थिएटरमध्ये बाहुबली 2 च्या तिकिटांची किंमत सर्वाधिक 2400 रूपये आहे. 
 
सोमवारपासून बंगळुरुमध्ये तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर काही क्षणातच तिकीट हाऊसफुल्ल झाले. बूक माय शो, पेटीएमवर आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणात पहिल्या विकेंडची सर्व तिकीट बूक झाली आहेत. भारतात हा सिनेमा 8000 स्क्रीन्सवर रिलीज होत आहे.