बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बाहुबली आणि रोहित शेट्टीत गोलमाल !

अशी बातमी पसरली होती की रोहित शेट्टी बाहुबली फेम प्रभास याच्यासोबत एक चित्रपट तयार करणार आहे, परंतू रोहितने असे नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही बातमी पसरली तेव्हा मी स्पेनमध्ये 'फिअर फेक्टर' ची शूटिंग करत होतो असे रोहित ने सांगितले. अर्थातच पूर्ण बातमी गोलमाल निघाली.
अलीकडे रोहित आपल्या आगामी चित्रपट गोलमालवर काम करत आहे ज्यात अजय देवगण, परिणीती ‍चोप्रा, तब्बू, अरशद वारसी, कुणाल खेमू आणि तुषार कपूर दिसतील. दिवाळीच्या दरम्यान हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच दुसरीकडे प्रभास हा 'साहो' नावाच्या चित्रपटात बिझी आहे. म्हणून अशी गोलमाल बातमी कुठून पसरली हे तर रोहितलाही माहीत नाही परंतू प्रभास लवकरच इतर बॉलीवूड चित्रपट साइन करू शकतो.