Marathi Biodata Maker

अरे बाप रे! भारतात येण्यासाठी या आहे बीबरच्या मागण्या

कॅनडाचे पॉप सेन्सेशन 23 वर्षीय जस्टिन बीबर 10 मे रोजी भारतात परफॉर्म करणार. हा कार्यक्रम मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार असून बीबर पहिल्यांदाच भारतात येणार आहे. संगीत प्रेमींमध्ये या कार्यक्रमासाठी खूप उत्साह आहे परंतू काय आपल्या माहीत आहे की बीबरने येथे येण्यापूर्वी काय मागण्या केल्या आहेत? जाणून घ्या त्याच्या मागण्या:
* जस्टिन बीबरसाठी 20 लक्झरी सेडान कार आणि दोन वॉल्वो बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात * बीबरच्या टीमचे 120 लोकं यात्रा करतील.
* बीबरसाठी प्रायव्हेट रॉल्स रॉयस कार.
* महाराष्ट्र पोलिसातर्फे झेंडा लेवल सुरक्षा. याव्यतिरिक्त त्याचे पर्सनल 8 सिक्युरिटी सदस्य असणार.
* परदेशातून 10 कंटेनर्समध्ये त्याच्यासाठी टेबल टेनिस टेबल, प्ले स्टेशन, सोफा सेट, वाशिंग मशीन, फ्रीज, अलमारी आणि मसाज टेबल येणार.
* बीबरसाठी जकुझी. हे तो स्टेजवर जाण्यापूर्वी वापरू शकतो.
* दोन फाइव स्टार हॉटेल्सचे काही फ्लोअर पूर्णपणे बीबरसाठी बुक राहतील. येथे फक्त तो आणि त्याची टीम राहू शकेल.
* त्याच्यासाठी पर्सनल 1000 स्क्वेअर फीटचा सुइट सजवण्यात येईल.
* त्याची खोली जांभळ्या रंगाच्या फुलांनी सजवण्यात येईल कारण जांभळा त्याचा आवडता रंग आहे.
* योगा आणि मसाजसाठी एसेंशियल ऑइल्स, जॅस्मीन, मोगरा, गुलाब आणि कापूरच्या लाकड्या वापरण्यात येतील.
* एक पर्सनल मसाज करणार्‍या व्यक्तीला खास केरळहून बोलण्यात येईल.
* चक्र आणि आसनांवर आधारित पुस्तक त्याच्या सुइटमध्ये ठेवण्यात येतील.
* टॉप क्लास शेफ त्याच्यासाठी जेवण तयार करतील. चार दिवसीय यात्रेदरम्यान त्याला सर्व्ह करण्यात येणार्‍या * पदार्थांमध्ये पाच पदार्थ असे असतील ज्यांचे नाव त्याच्या प्रसिद्ध गाण्यावर आधारित असेल.
* बीबरला भारत दर्शनाची हुक्की आली तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी एक प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टर पूर्ण वेळेस तिथे उपलब्ध असणार.
* बीबरने भाज्या रोच सॉसमध्ये शिजवणे, चिरलेले फळं, ऑरगेनिक केळी आणि द्राक्षाची मागणी केली आहे.
* स्नेक्ससाठी बीबरला ऑर्गेनिक तर्की, लेटुस, कॉल्बाय आणि प्रोवोलोन चीज, ब्लॅक ऑलिव्ह आणि बनाना पेपर दिले जाईल.
* बॅक स्टेजसाठी व्हाईट स्लाइस्ड ब्रेड, पोटेटो चिप्स, मिंट, टरबूज गम, व्हाईट चेडार पॉपकॉर्न, डॉर्क चॉकलेट विथ सीसॉल्ट, बदाम, मेंथॉल, व्हिनेगर चिप्स, ऑर्गेनिक ड्राइड फ्रूट, शेंगदाणे आणि ऑल बेरीज सीरियल मागितले आहे.
* बीबरच्या मागणीप्रमाणे खोलीतील परदे पूर्णपणे पांढरे असावे. येथे एक मोठा ग्लास डोर रेफ्रिजरेटर, क्लोदिंग शेल्व्स, आठ पॉवर आउटलेट आणि 12 पांढरे रूमाल ठेवले असले पाहिजे.

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी वयाच्या ६०व्या वर्षी बांधली होती लग्नगाठ

'काला हिरण'वरून नवा वाद! गोविंद नामदेवांचे निर्मात्यांवर गंभीर आरोप; सलमानच्या बॉडीगार्डने धमकावल्याचा अमित जानींचा दावा

International Picnic Day 2026 : आंतरराष्ट्रीय सहल दिवस, रंजक इतिहास आणि महत्व

"मी खूप औषधे घेत आहे," सोनू निगमने आपल्या प्रकृतीबद्दल खुलासा केला

पुढील लेख
Show comments