शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

8 हजार द्या, अमिताभच्या घरी जेवा

ही बातमी ऐकून अमिताभचे चाहते नक्कीच खूश होतील. आपण अमिताभच्या घरी दावत उडवू शकता, हे कसे शक्य आहे जाणून घ्या?
वन स्टार हाउस पार्टी शेफ एक ग्रुप आहे. हा ग्रुप अमिताभच्या घरी एक पॉप अप रेस्टॉरन्ट उघडणार आहे. अमिताभचे चाहते त्यांच्या घरी जेवण्याचा आनंद घेऊ शकतात. फक्त यासाठी त्यांना काही किंमत मोजावी लागणार आहे.
 
येथे जेवू इच्छित लोकांना रांगेत उभे राहावे लागेल. आणि सुमारे 8 हजार रुपये देऊन ते एक टेबल बुक करू शकतील. प्रसिद्ध शेफ जेम्स शरमन आणि इतर पाच शेफ हे रेस्टॉरन्ट सुरू करत आहे. हे रेस्टॉरन्ट अमिताभच्या जुहू स्थित बंगला प्रतिक्षा येथे असणार. हे रेस्टॉरन्ट 17 ते 21 जानेवारीपर्यंत उघडे राहणार.