Biodata Maker marathi
✕

Don 3: फरहान अख्तर 'डॉन 3' मध्ये दिग्दर्शना सोबत अभिनय करणार , नवीन अपडेट आले

Updated: बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (07:14 IST)
 
अंडरवर्ल्डच्या राजाची गाथा पुढे नेत, 'डॉन 3' त्याच्या घोषणेपूर्वीच चर्चेत होता. पण जेव्हापासून फरहान अख्तरने या चित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. अभिनेता रणवीर सिंग अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा वारसा पुढे नेण्यास सक्षम असेल की नाही याबद्दल चाहत्यांना शंका आहे. यापूर्वी 'डॉन 3' बद्दल अशी माहिती होती की अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, परंतु नंतर क्रिती सेनॉनच्या नावाच्या अफवा ऐकू आल्या. मात्र, शोभिता धुलिपालाने ही भूमिका साकारावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. 'डॉन 3'मध्ये रोमाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या नावावर निर्मात्यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
अभिनेत्रीच्या नावाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या अटकळांच्या दरम्यान फरहान अख्तरने 'डॉन 3'चे नवीन अपडेट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. बातमी अशी आहे की फरहान 'डॉन 3'चा केवळ निर्माता म्हणून नाही तर अभिनेता म्हणूनही असणार आहे. फरहानने अलीकडेच एका मीडिया संस्थेशी संवाद साधताना ही बातमी शेअर केली.रणवीरच्या कास्टिंगबद्दल बोलताना फरहानने म्हटले की, त्यांना काळजी करायचे कारण  नाही या अभिनेत्याने स्वत:ला खरोखर चांगला आणि अष्टपैलू अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे.
 
फरहान अख्तर म्हणाला, 'मी निःसंशयपणे सांगू शकतो की तो या चित्रपटात अतिशय चमकदार कामगिरी करेल.' आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्या 'जी ले जरा'बद्दल बोलताना तो म्हणाला की सध्या त्याचे लक्ष 'डॉन 3'वर आहे. अभिनेता म्हणून 'डॉन 3' मध्ये सामील होण्यापूर्वी तो पुढच्या वर्षी दोन चित्रपटही करत असल्याचे त्याने सांगितले. फरहानने खुलासा केला की तो जानेवारीमध्ये एक चित्रपट सुरू करणार आहे, ज्याची निर्मिती आमिर खान प्रॉडक्शन करणार आहे.




Edited by - Priya Dixit 
 
 
 

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

रामायणाने इतिहास रचला! २७ देशांमध्ये नंबर १ भारतीय चित्रपट बनत १७७७ कोटींचा टप्पा ओलांडला

बिहारी महिला आणि छठ-सिंदूरवर टिप्पणी केल्याप्रकरणी कॉमेडियनविरोधात एफआयआर दाखल

पुढील लेख
Show comments