सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2024 (14:14 IST)

Comedy Actor Seshu Passed Away : प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेता शेषू यांचे निधन

Seshu Death
Comedy Actor Seshu Passed Away :साउथ इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दक्षिणेतील लोकप्रिय कॉमेडी अभिनेता शेषू यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 60 व्या वर्षी या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण साउथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.शेषू यांची प्रकृती अनेक दिवसांपासून खालावली होती आणि त्यांच्यावर चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते

वृत्तानुसार, 15 मार्च रोजी शेषू यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आजारातून ते बरे होऊ शकले नाहीत आणि २६ मार्च रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांचे चाहते आणि सिनेविश्वातील सहकलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. 
 
शेषू यांच्या निधनाच्या वृत्ताला लोकप्रिय अभिनेते आणि शेषू यांचे जवळचे मित्र रॅडिन किंग्सले यांनी दुजोरा दिला आहे. रॅडिन किंग्सले यांनी सोशल मीडियावर शेषूच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
 
अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे शेषूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
 
लोकप्रिय अभिनेता धनुषच्या 'थुल्लूवधो इलामाई' या चित्रपटातून पदार्पण केले होते. यानंतर त्यांना लोकप्रिय टीव्ही कॉमेडी शो 'लोल्लू सभा'मध्ये काम करण्याची संधी मिळाली जी त्यांची खरी ओळख बनली. शेषूने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये 'गुलु गुलू', 'नई सेकर रिटर्न्स', 'बिल्डअप', 'ए1', 'डिक्किलुना', 'द्रौपती' आणि 'वडक्कुपट्टी रामासामी' यांसारख्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. 
 
 Edited by - Priya Dixit