Daily Horoscope
✕

GOOD NEWS:कुणाल कपूर बनला वडील, पत्नी नयना बच्चनने दिला मुलाला जन्म

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (14:04 IST)
 
कुणाल कपूरकाही थोड्यावेळापूर्वी एका पोस्टमध्ये लिहिले होते, 'आमच्या सर्व शुभचिंतकांसाठी, मला आणि नैनाला तुमच्यासोबत हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आम्ही एका सुंदर बाळाचे अभिमानास्पद पालक झालो आहोत. आम्हाला मिळालेल्या विपुल आशीर्वादांसाठी आम्ही देवाचे आभार मानतो. लग्नाच्या 7 वर्षानंतर कुणाल आणि नैना बच्चन आई-वडील झाले आहेत.
 
कुणाल कपूरने कधीच कल्पना केली नव्हती की तो अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करेल. त्याला फक्त बॉलीवूडशी कोणत्या ना कोणत्या रूपाने जोडले जावे असे वाटत होते. त्यामुळेच त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांच्या 'अक्स' चित्रपटात तो असिस्टंट डायरेक्टर होता, त्यावेळी काय माहीत होते की एक दिवस कुणालही बच्चन कुटुंबाचा भाग बनेल. कुणाल कपूरचे वडील किशोर कुमार हे बिझनेसमन होते. आई कानन गृहिणी असण्यासोबतच गाणीही म्हणायची, ज्याचा परिणाम कुणालवर झाला आणि तो कलेच्या जगाकडे आकर्षित झाला.
 
शाळेत असताना त्यांनी अनेक नाटके केली. पुढे त्याने बॅरी जॉनकडून अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले. यानंतरही त्याचा अभिनय करण्याचा कोणताही विचार नव्हता. 'रंग दे बसंती' चित्रपटातील त्याचे काम सर्वांनाच आवडले. यानंतर त्याने 'हॅटट्रिक', 'लागा चुनरी में दाग', 'आजा नच ले', 'लम्हा', 'डॉन-2' आणि 'गोल्ड' असे अनेक चित्रपट केले. मात्र त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. दरम्यान, 2015 मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांचे भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी नैनासोबत लग्न केले.
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

'जपनाम' पुन्हा एकदा गाजणार, बॉबी देओलच्या 'आश्रम ४' चे शूटिंग पूर्ण

कान्हेरी लेणी : मुंबईतील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अनमोल वारसा

दिलजीत दोसांझच्या बंगळूरु कॉन्सर्टला बॉम्बची धमकी मिळाली

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त हेमा मालिनी भावूक! म्हणाल्या, "त्यांच्याशिवाय आयुष्य खूप रिकामं वाटतं"

अमेरिकेत इतिहास रचल्यानंतर 'रामायण'ला मोठा धक्का, रणबीर कपूरचा चित्रपट ८०० चित्रपटगृहांमधून हटवला

पुढील लेख
Show comments