गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (10:25 IST)

Happy Birthday Anil Kapoor :वयाच्या 64 व्या वर्षीही अनिल कपूर फिट आहेत

Happy Birthday Anil Kapoor: Even at the age of 64
अभिनेता अनिल कूपर आज (24 डिसेंबर) आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनिल कपूरच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुली अभिनेत्री सोनम आणि रिया कपूर यांनी त्यांच्या वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोनम सध्या तिचा पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहत आहे, तर रिया गोव्यात आहे आणि बॉयफ्रेंड करण बुलानीसोबत ख्रिसमस साजरा करत आहे, रियाने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केल्या आहेत. 
 
अनिल कपूरचा नवीन चित्रपट 'AK Vs AK' त्याच्या वाढदिवसानिमित्त नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित या चित्रपटात अनुराग कश्यपचीही भूमिका आहे. अनिल कपूर बॉलीवूडमधील सर्वात चिरतारुण्य अभिनेत्यांपैकी एक आहे. ते  'मिस्टर इंडिया', 'परिंदा', 'नायक', 'विरासत' आणि 'तेजाब' यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जातात.