suvichar
✕

हितेश भारद्वाजचा ‘आहट’पासून ‘आमी डाकिनी’ पर्यंतचा प्रवास

Updated: बुधवार, 2 जुलै 2025 (16:56 IST)

या मालिकेत हितेश भारद्वाज अयानच्या भूमिकेत आहे, तर शीन दास आणि राची शर्मा अनुक्रमे डाकिनी आणि मीरा यांच्या भूमिका करत आहेत.
 
आपला उत्साह शेअर करताना अभिनेता हितेश भारद्वाज म्हणतो, “आहट मी लहानपणी आवर्जून बघायचो. त्यातील शांतता आणि अचानक येणारा थरार यांचे मला आकर्षण वाटत असे. मला भीती वाटायची पण ती मालिका बघवीशीही वाटायची.” तो पुढे म्हणतो, “माझ्या चुलत भावंडांसोबत ही मालिका बघितल्याचे मला आठवते आहे. आम्ही सगळे जण एका पांघरूणात गुरफटून बसायचो. भीती वाटत नाही असे दाखवायचो, पण प्रत्येक आवाजाला दचकायचो. या आठवणी मनात आजही जिवंत आहेत.”
 
तो पुढे म्हणतो, “तशाच प्रकारची ऊर्जा असणाऱ्या एका मालिकेत आता मी स्वतः काम करत आहे, ही भावना स्वप्नवत आहे. पलंगावर बसून टीव्हीवर मालिका बघणारा एक लहान मुलगा आता प्रत्यक्ष टीव्हीच्या पडद्यावर आला आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही फक्त एक भूमिका नसून त्याला व्यक्तिगत भावनेचा स्पर्श आहे.

मी साकारत असलेला अयान म्हणजे एक गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व आहे. तर्कनिष्ठा आणि अंतःस्फूर्ती, तर्क आणि मान्यता यांच्या कात्रीत तो सापडला आहे. त्याची भूमिका करताना मनातील अव्यक्त, अबोध भीतीचा सामना मी करत आहे. काही भावनिक भीती, आंतरिक लढा यांच्याशी सामना होत आहे. यामुळेच हे पात्र मला खूप जिवंत वाटते.”
बघा, ‘आमी डाकिनी’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

पुढील लेख
Show comments