गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (09:48 IST)

मी आवडत नसेन, तर माझे सिनेमे पाहू नका - आलिया भट्ट

alia bhatt
मी आवडत नसेन, तर माझे सिनेमे पाहू नका, असं म्हणत अभिनेत्री आलिया भट्टने ट्रोलिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.  "माझे आई-वडील सिनेसृष्टीत काम करतात, यात माझी काय चूक? उद्या जर कोणत्या अभिनेता-अभिनेत्रीच्या मुलांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करायचं असेल तर त्यांना स्वत:ला सिद्ध करावं लागेल," असं आलिया मुलाखतीत म्हणाली.
 
नेपोटिझमबाबतच्या टीकेवर 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, "मी या टीकांना उत्तरं देऊ शकत नाही. जर तुम्हाला मी आवडत नसेन, तर मला पाहू नका. मी यात काहीच करू शकत नाही."
 
पुढे आलियानं असा विश्वासही व्यक्त केला की, "मी आज ज्या जागेवर आहे, तिथं मी असणं किती योग्य आहे, हे सिद्ध करेन."
 
आलियाचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात रणबीर आणि आलिया दोघे एकत्रित दिसणार आहेत.
 
नुकता आलियाचा 'डार्लिंग्स' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.