केतन यांनी आपल्या जबाबात सांगितले की, ‘जून २०१५ मध्ये मी कंगनाला माझ्या सिनेमात राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी विचारले होत. तेव्हा तिने या सिनेमात काम करण्याचे मान्यही केले होते. आम्ही तिला सिनेमाची संहिता आणि काही संशोधन केलेली कागदपत्र पाठवली होती. या विषयावर आमच्या चर्चाही झाल्या होत्या. पण नंतर तिने ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ Manikarnika – The Queen of Jhansi या सिनेमाची घोषणा दुसऱ्याच दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत केली. त्यामुळे आमच्या सिनेमाची संकल्पना चोरल्यामुळे आम्ही कंगनाला नोटीस बजावली आहे.’